Tharala Tar Mag Twist : ‘ठरलं तर मग’ या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. आजवर या मालिकेने रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं. मालिकेत आलेले टर्न आणि ट्विस्ट प्रेक्षकांना भावले. सायली व अर्जुन या या जोडीला तर रसिकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं. सध्या मालिकेत आलेल्या रंजक वळणाने ही मालिका चर्चेत आहे. अर्थातच मालिकेत आलेल्या ट्विस्टने ही मालिका टीआरपीच्या शर्यतीतही अव्वल ठरली. मालिकेत विलास खुनाचा अखेर निकाल लागला आहे. अर्थात अर्जुन ही केस जिंकला असून त्याने मधुभाऊंची या सगळ्यातून सुखरूप सुटका केली आहे.
तर प्रिया व साक्षी यांना या खुनाची शिक्षा म्हणून सात वर्ष तुरुंगवास ठोठावण्यात आला आहे. सुभेदारांसमोर प्रियाचं खरं रूप येताच साऱ्यांना खूप मोठा धक्का असतो. तर प्रियाचा नवरा अश्विन मात्र या सगळ्याला अर्जुनलाच जबाबदार ठरवतो. तो प्रियाच्या प्रेमात आंधळा झालेला असतो आणि म्हणूनच तो प्रियाला सोडवण्यासाठी प्रयत्न सुरु करताना दिसतो. इतकंच नाही तर महीपतचा आता राग अनावर झालेला असतो. दामिनी ही केस हरल्याने साक्षीला अटक झाल्याचं महीपत पचवू शकत नाही. त्यामुळे तो तिकडे तांडव करताना दिसतोय. तर इकडे नागराजलाही हा पलटवार कसा झाला हे कळत नाही.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध मल्याळम अभिनेत्याचे ५२व्या वर्षी निधन, हॉटेलच्या रुममध्ये आढळला मृतदेह, नेमकं प्रकरण काय?
या सगळ्या गोष्टी मार्गावर जाता-जाता आता मालिकेत आणखी एक ट्विस्ट आला असल्याचं दिसत आहे. मालिकेचा एक नवा प्रोमो समोर आला आहे. आणि यामध्ये सायली आणि अर्जुन एकमेकांशी गप्पा मारत असतात. याचवेळी अचानक खिडकीतून कोणीतरी दगड फेकून मारतं. त्या दगडावर धमकीची चिठ्ठी लिहिलेली असते. त्यावर अर्जुन आता वेळ तुझा जीव घेण्याची असं लिहिलेलं असतं. त्यामुळे सायली आणि अर्जुन दोघेही चिंतेत येतात.
सुभेदारांच्या घरात काहीतरी कार्यक्रम असल्यामुळे घर सजवलेलं असतं. अर्जुन कामानिमित्त ऑफिसला जात असताना सायली त्याला अडवते आणि स्वतःचा पदर त्याच्या हाताला बांधून आज तुम्ही कुठेही जायचं नाही असं सांगते. आता जिथे तुम्ही तिथे मी’ असं म्हणत ती निघते. सायली व अर्जुनमधील प्रेमाचे बंद फुलताना दिसत आहेत, असं असलं तरी सायली हे अर्जुनचा जीव वाचवण्यासाठी करतेय हे स्पष्ट होत आहे. आता नेमकं अर्जुनच्या जीवावर कोण उठलं आहे?, अर्जुन यातून वाचणार का?, की सायली त्याची सुटका करणार हे सारं येणाऱ्या भागात कळेल.





