बुधवार, जून 3, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुभेदाराच्या घरात प्रियाच्या आई-बाबांची एंट्री, पण सायली-अर्जुनचा मोठा गैरसमज; मालिकेत मोठा ट्विस्ट

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 10, 2025 | 12:09 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
tharala tar mag

सुभेदाराच्या घरात प्रियाच्या आई-बाबांची एंट्री, पण सायली-अर्जुनचा मोठा गैरसमज; मालिकेत मोठा ट्विस्ट

tharala tar mag : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. ज्यामुळे मालिकेतील सायली आणि अर्जुनची जोडीही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसत आहे. ‘ठरलं तर मग’ ही मालिका गेले तीन वर्ष प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. टीआरपीमध्ये या मालिकेने सर्व रेकॉर्ड मोडले. मालिकेमधील वेगवेगळी वळणे प्रेक्षकांना नेहमीच आवडतात. सध्या या मालिकेमध्ये अर्जुन सुभेदार सायली आणि प्रियाचा भूतकाळ शोधण्याचा प्रयत्न करत आहे.

मालिकेत सध्या गेल्या काही दिवसांपासून अर्जुन आपल्या बायकोच्या म्हणजेच सायलीच्या आई-बाबांचा शोध घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. सायली ही रविराज किल्लेदार यांची मुलगी असल्याचं सत्य मधुभाऊंना माहिती असतं. पण हे सत्य उघड होऊ नये म्हणून नागराज मधुभाऊंवर हल्ला करतो, ज्यामुळे ते कोमात जातात. मात्र कोमात जाण्यापूर्वी ते अर्जुनला सायलीचे आई-बाबा जिवंत असल्याचा एक मोठा इशारा देतात.

आणखी वाचा – ‘आठ तासच काम करणार’ यामुळे चर्चेत आलेल्या दीपिका पदुकोणने अखेर भाष्य केलंच, म्हणाली, “विचित्र कारणास्तव…”

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

दरम्यान, ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने नुकताच नवीन प्रोमो शेअर केला आहे, ज्यामध्ये अर्जुनला सायलीच्या आई-बाबांबद्दल चुकीची माहिती महीपत आणि नागराज देतात. ज्यामुळे अर्जुनला गैरसमज होतो. जे आई-बाबा प्रियाचे असतात, त्यांनाच अर्जुन सायलीचे आई-बाबा समजतो आणि सायलीला त्यांना भेटायला घेऊन जातो. पुढे प्रोमोमध्ये सायली तिच्या आई-बाबांना पाहून भावूक होते. पण एकीकडे प्रियाला तिच्या आई-बाबांचं खरं सत्य माहिती असल्यामुळे ती टेन्शनमध्ये येताना दिसते आणि म्हणते, “माझे आई-बाबा इथे… आता मी काय करणार?” असं म्हणताना ती दिसते.

आणखी वाचा – मित्राच्या श्रद्धांजलीच्या पोस्टनंतर अभिनेत्याचेही निधन, शस्त्रक्रियेदरम्यान हृदयविकाराचा झटका आला आणि…

आता मालिकेत सायली प्रियाच्या आई-बाबांना स्वतःचे आई-बाबा समजेल का? की सायलीसमोर सत्य आल्यानंतर ती नेमकं काय करेल? आणि प्रिया हे सत्य लपवण्यासाठी काय-काय करेल? हे पाहणं अगदी मनोरंजक ठरणार आहे. ठरलं तर मग या मालिकेचा प्रोमोनुसार सायली आणि प्रियाच्या नातेवाईकांमध्ये पूर्ण गोंधळ निर्माण होणार आहे. जोपर्यंत मधु भाऊ शुद्धीवर येत नाही तोपर्यंत हा गुंता सुटणार नाही त्यामुळे मालिकेत काय काय घडणार हे पाहणं रंजक ठरेल.

Tags: marathi serialstar pravahTharala tar mag
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 aruna irani cancer
Entertainment

केमोथेरपीला नकार, केस गळतीची भीती आणि…; ७९ वर्षीय सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला दोनदा झाला कॅन्सर, स्वतःच्याच चुकीने…

जून 3, 2026 | 10:14 am
Amol Kolhe on Me Savitribai Jotirao Phule
Entertainment

सहा नव्या मालिका येताच ‘ही’ जुनी मालिका होणार बंद, ‘स्टार प्रवाह’चा मोठा निर्णय

जून 1, 2026 | 1:08 pm
Swanandi Tikekar new home photos
Entertainment

तीन वर्षाचं स्वप्न…; मराठी सेलिब्रिटी कपलने मुंबईत घेतलं नवं घर, बाल्कनीत पोज देत शेअर केली आनंदाची बातमी

जून 1, 2026 | 12:00 pm
Suman Kalyanpur Death
Entertainment

“आजकल तेरे मेरे प्यार के” गाण्याचा आवाज हरपला, सुप्रसिद्ध गायिकेचं वयाच्या ८९व्या वर्षी निधन

जून 1, 2026 | 9:55 am
Next Post
Tu Maza Kinara Trailer

बापाच्या कर्तव्याची, लेकीच्या प्रेमाची आणि कुटुंबाच्या जगण्याची ओढ; 'तू माझा किनारा' चित्रपटाचा ट्रेलर समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.