Shiny Doshi Shocking Revelation : अभिनेत्री शाईनी दोशीने आजवर बर्याच टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. २०१२ मध्ये ती मुंबईला आली आणि संजय लीला भन्साळी यांचा ‘सरस्वती चंद्र’ हा पहिला शो तिला मिळाला. यावेळी तिला अभिनय काय आहे हे देखील माहित नव्हते कारण तिने यांत काहीच शिक्षण घेतले नव्हते. तिने सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ती काही कारणास्तव अभिनयात आली आहे. आणि हे कारण असे होते की तिच्या वडिलांनी तिला सोडले होते. आणि त्याचवेळी अभिनेत्रीला तिच्या कॉलेजची फी स्वत: द्यावी लागायची. यादरम्यान कोणीही काळजी घेणार नव्हता. तिने असेही सांगितले की, तिचे वडील तिला ‘वेश्या’ म्हणत असत. अभिनेत्रीच्या पूर्वाश्रमीच्या प्रियकरानेही तिची बर्याच वेळा फसवणूक केली आहे.
शाईनी दोशी हिने मुलाखतीत सांगितले की, “माझी काळजी घेण्यासाठी कोणीही नव्हते. मला माझ्या कुटुंबाची एका मुलाप्रमाणे जबाबदारी घ्यावी लागली. मला एक मुलगा म्हणून प्रत्येकाची काळजी घ्यावी लागली. जेव्हा मी मुंबईला आले तेव्हा माझ्या खात्यात सुमारे १५ हजार रुपये होते. मी कुठे राहणार आहे हेदेखील मला माहित नव्हते. मी काम करण्यास कसे सक्षम होईन या सर्व कारणास्तव मी अहमदाबादमध्ये मॉडेलिंग केले. छोट्या छोट्या जाहिरातींमध्ये काम केले. माझ्या आईची इच्छा होती की, मी अभिनेत्री व्हावी आणि मला डॉक्टर व्हायचे होते. आमच्या घरात आईच वर्चस्व अधिक होतं, तिने दोन्ही पालकांची भूमिका साकारली”.
आणखी वाचा – Video : बायकोला मंगळसूत्र घालताना भर मंडपात रडला अक्षय केळकर, अश्रूच थांबेनात अन्…; व्हिडीओ तुफान व्हायरल
शाईनीने सांगितले की, तिने बर्याच ऑडिशन दिल्या आहेत आणि मग तिला तिचा पहिला शो मिळाला. तिने सांगितले की, जेव्हा तिचे पालक विभक्त झाले, तेव्हा वडिलांकडील कुटुंबीयांनी तिच्याशी असलेला संबंध तोडला. आणि जेव्हा तिचा पहिला शो आला तेव्हा वडिलांकडील कुटुंबाला आश्चर्य वाटले की, तिच्या आईने तिला चांगलं घडवलं. अभिनेत्री म्हणाली, “मी एका पुराणमतवादी गुजराती कुटुंबातून आले आहे. आमच्या कुटुंबात अभिनयाकडे खालच्या नजरेने पाहिले जाते. ही एक अभिनेत्री आहे म्हणजे ही काय काम करत असेल, अशा नजरेने पाहिलं जातं. अभिनेते असे आहेत. माझ्या कुटुंबात असे बरेच लोक होते जे मला एक अभिनेत्री आहेस म्हणजे वेश्या आहेस असं म्हणायचे. पण जेव्हा पहिला शो आला तेव्हा सगळ्यांची तोंड बंद झाली”.
आणखी वाचा – वडिलांचा शेवटचा फोन, सुरक्षित आहे बोलले अन्…; शहीद सुरेंद्र मोगा यांच्या लेकीचा आक्रोश, म्हणाली, “बदला घेईन”
शाईनीने नोंदवले की, तिचे पालक वयाच्या १६ व्या वर्षी विभक्त झाले आहेत. आणि त्यानंतर सर्व जबाबदारी तिच्या खांद्यावर होती. अभिनेत्रीने सांगितले की, कालांतराने तिच्या वडिलांनी पैसे देणे बंद केले आहे, तेव्हा आईने ते आम्हाला सोडून गेले आहेत याची जाणीव करुन दिली नाही. ती तिचे सोन्याचे दागिने विकत होती आणि तिचा खर्च खर्च करीत होती. एके दिवशी रेशन दुकानदारांनी आईला रेशन देण्यास नकार दिला कारण तीन महिन्यांपासून बिल दिले नव्हते. त्याचवेळेला कॉलेजची फीदेखील भरता आली नाही म्हणून प्राध्यापकांनी फी भरेपर्यंत कॉलेजला येण्यास बंदी घातली”.
शाईनी पुढे म्हणाली की, “वडील आईला खूप मारत असत. माझ्या आईने लाथा-बुक्क्यांचा मार खाल्ला आहे आणि मी हे सर्व पहायचे तेव्हा मला भीती वाटायची. हे सर्व पाहून मी स्वत: ला खोलीत लॉक करायचे कारण ते मला पटायचे नाही. माझे वडील माझे ऐकत असत. मी आजही त्यांच्यावर प्रेम करते. ते सध्या या जगात नाहीत. बालपण पूर्णपणे आपत्ती होती. पण मी लहानपणाच्या आघातातून एक गोष्ट शिकले की मी माझे आयुष्य घडवणार आणि ते मी वाया जाऊ देणार नाही”. शाईनीने सांगितले की, तिचे वडील तिला’वेश्या’ म्हणत असत. जेव्हा त्यांचे आईशी भांडण झाले तेव्हा तेव्हा ते आईला घाणेरड्या शब्दांत बोलायचे. ते माझ्या आईला विचारायचे की, रात्री तीन वाजता तू माझ्या लेकीला घेऊन येतेस?, एवढ्या रात्री पर्यंत काय काम असतं?, धंदा करायला घेऊन जातेस का?. त्यांची भाषा खूप भयंकर असायची.