गुरूवार, जून 5, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मुलींच्या संगोपनासाठी ‘छोटी बहू’ने घेतला मोठा निर्णय, मुंबई नाही तर हिमाचल प्रदेशमध्ये रुबिना दिलैक लेकींबरोबर राहणार कारण…

Shamal Sawantby Shamal Sawant
जानेवारी 6, 2025 | 11:48 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
rubina dilaik on daughters

रुबिना दिलैकने मुलींच्या सांगोपनावर केले भाष्य

टेलिव्हिजन अभिनेत्री रुबिना दिलैक सध्या खूप चर्चेत असलेली बघायला मिळत आहे. रुबिना आजवर अनेक मालिकांमध्ये दिसून आली आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात आई झाल्याची गुडन्यूज शेअर केली होती. रुबिनाने जुळ्या मुलींना जन्म दिला. मुलींच्या जन्मादरम्यान तिने सोशल मीडियावरून ब्रेक घेतला होता. मुलींच्या जन्माच्या एक महिन्यानंतर अभिनेत्रीने ही आनंदाची बातमी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली. त्यानंतर अनेकदा मुलींविषयीचे प्रत्येक अपडेट्स चाहत्यांबरोबर शेअर केले. अनेक पॉडकास्टमध्येही तिने मुलींबद्दलच्या अनेक अपडेट चाहत्यांबरोबर शेअर केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मुलींच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त काही गोड फोटो शेअर केले होते. जिवा व इधा यांचा पहिला वाढदिवस साजरा केला. (rubina dilaik on daughters)

रुबिना नुकतीच पारस छाबराच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती.  यावेळी तिने तिच्या मुलींबद्दल भाष्य केले. यावेळी तिने मुलींना मुंबईमध्ये न ठेवता हिमाचलमध्ये मोठं करत असल्याचे सांगितले आहे. ती म्हणाली, “मुलींना चांगलं वातावरण मिळावं यासाठी मी व अभिनव खूप सजग आहोत. जेव्हा मी व अभिवन बाळासाठी प्रयत्न करत होतो तेव्हाच मुलं कुठे मोठी होणार, कशी मोठी होणार? याबद्दल ठरवलं होतं. मुलं जमिनीशी जोडलेली असावीत आणि त्यांनी गावचे आयुष्य बघावे असे आम्हाला वाटायचे”.

आणखी वाचा -आधी चाकूने आणि नंतर लोखंडी रॉडने वार अन्…; ‘क्राईम पेट्रोल’च्या ‘या’ अभिनेत्यावर जीवघेणा हल्ला

View this post on Instagram

A post shared by Rubina Dilaik (@rubinadilaik)

पुढे ती म्हणाली, “आम्हाला त्यांना स्वच्छ वातावरणात मोठं करायचं आहे. मातीत खेळावं, चांगल्या ठिकाणी मोठी व्हावीत. तसेच जितकं जमेल तितकं गावाशी जोडलेले राहतील आणि शेतीमध्ये पिकलेले धान्य त्यांना मिळेल याकडे आम्ही लक्ष देणार आहोत”. दरम्यान रुबिना स्वतः हिमाचलची असून ती तिथेच लहानाची मोठी झाली आहे. त्यामुळे मुलीदेखील अशा वातावरणात मोठ्या व्हाव्यात असे तिला वाटते.

आणखी वाचा – “धर्माचे शून्य ज्ञान…”, सोहा अली खानने वडिलांच्या कबरीसमोर केलेल्या ‘त्या’ कृतीवर नेटकरी संतापले, म्हणाले, “इस्लाममध्ये…”

रुबिना व अभिनवने जून २०१८ मध्ये शिमला येथे लग्न केले. यानंतर, सप्टेंबर २०२३ मध्ये तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून गरोदरपणाची घोषणा केली. रुबिना ही हिंदी टीव्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती ‘बिग बॉस’ २०१४ ची विजेतीही होती. रुबिनाने टीव्ही इंडस्ट्रीमध्ये १६ वर्षांहून अधिक काळ घालवला आहे.     

Tags: abhinav shukladaughersrubina dilaik
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
Kangana Ranaut Emergency Official Trailer 2

'इमर्जन्सी'चा दुसरा ट्रेलर प्रदर्शित, कंगना रनौतच्या भूमिकेचं कौतुक, नेटकरी म्हणाले, "पाचवा राष्ट्रीय पुरस्कारही…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.