Rubina Dilaik Father Accident : अभिनेत्री रुबीना दिलैकच्या कुटुंबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. अभिनेत्रीच्या बहीण आणि वडीलांचा अपघात झाली असल्याचे समोर आले आहे. रुबिनाची धाकटी बहीण ज्योतीका दिलैक हीदेखील यूट्यूबर आहे. तिची बहीण ज्योतीका ‘बिग बॉस’मध्येही दिसली होती, जेव्हा रुबीना ‘बिग बॉस’मध्ये होती तेव्हा ती पाहुणी म्हणून आली होती. अलीकडेच, रुबीनाच्या बहिणीने तिच्या यूट्यूब व्लॉगमध्ये सांगितले की त्यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. तथापि, या अपघातात त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही आणि ते सुखरुप आहेत.
ज्योतिका दिलैक चंदीगडहून शिमला येथे पती रजत आणि वडील यांच्यासमवेत जात होती. दरम्यान, वाटेत, त्याच्या कारला मागून एका कारने धडक दिली. या अपघाताने ते तिघेही प्रचंड घाबरले. कारला मोठं बेंड आलं आहे. त्याच वेळी, गाडीची डिक्की देखील उघडत नव्हती. ज्या रस्त्यावर अपघात झाला त्या रस्त्यावर काम सुरू आहे. रस्ता चिखलाने भरलेला होता. रुबिनाची बहीण आणि वडील पूर्णपणे ठीक आहेत. तिघांपैकी कोणालाही कोणतीही दुखापत झालेली नाही.
आणखी वाचा – लाबुबू डॉल घरात आल्यापासून वाईट अनुभव, भारती सिंगने थेट जाळली बाहुली, म्हणाली, “माझा गोला वाईट…”
यानंतर, ते त्यांच्या घरी व्यवस्थित गेले. रुबीनाची बहीण नुकतीच थायलंड परदेश दौऱ्याहून परतली. ती या ट्रिपवरुन घरी जात होती, त्याच वेळी, त्यांचे वडील चंदीगडमध्ये सफरचंद विकल्यानंतर घराच्या दिशेने जाणारच होते. म्हणून सर्व एकाच कारमध्ये एकत्र होते. रुबीना बरेचदा तिच्या आई-वडिलांकडे म्हणजे शिमलाला राहायला जाते. तेथे शेतातील फळ, भाज्या काढतानाचे अनेक व्हिडीओ, फोटो ती पोस्ट करते. इतकंच नाही तर रुबीना शिमला येथील तिच्या घराजवळच्या परिसरातीलही अनेक व्हिडीओ पोस्ट करते.
रुबीना दिलैकबद्दल बोलायचे झाले तर, ती एक लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे.तिने छोटी बहू या शोमधून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. या शोमध्ये तिने राधिकाची भूमिका साकारली होती आणि हा शो प्रचंड हिट झाला होता. रुबीना आणि तिचा पती अभिनव शुक्ला दोघेही नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. दोघांना जुळ्या मुली आहेत.





