‘ये रिश्ता क्या केहलाता है’ या मालिकेमध्ये हिना खानची भूमिका अधिक गाजली आहे. हिनाने त्यानंतर अनेक मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसून आली आहे. ‘बिग बॉस’च्या ११ व्या पर्वामध्येही ती दिसून आली होती, मात्र आता ती अभिनयामुळे नाही तर तिच्या तब्येतीबद्दलची अपडेट समोर आली आहे. हिनाला स्तनाचा कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले. याबद्दल तिने स्वतः तिच्या चाहत्यांना माहिती दिली. या माहितीमुळे सगळ्यांनाचा धक्का बसला तसेच अनेक कलाकारांनी तिला पाठिंबादेखील दिला आहे. आता अभिनेत्री दलजीत कौरने आपल्या हिनाबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. (daljeet kaur on hina khan)
दलजित सध्या तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. दलजितने पहिले लग्न मोडल्यानंतर व्यावसाईक निखिल पटेलबरोबर लग्न केले. मात्र ते लग्नदेखील जास्त काळ टिकू शकले नाही. ती आता दुसऱ्या पती पासून घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चादेखील मोठ्या प्रमाणात झाल्या. तिने अनेकदा तिचे दु:ख सोशल मीडियावर बोलून दाखवले आहे. मात्र आता हिनामुळे तिला खूप आधार मिळत असल्याचे सांगितले आहे. हिनाची कर्करोगाबरोबरची लढाई बघून दलजित प्रेरणा मिळत आहे. हिनाने नुकतीच केमो थेरपी घेण्याआधी एका अवॉर्ड सोहळ्याला हजेरी लावली होती. तेव्हा तिने एक पोस्ट शेअर केली होती.

या व्हिडीओमध्ये फोटोशूटपासून सोहळ्याला जाईपर्यंत आणि यानंतर हॉस्पिटलमध्ये जाण्यापर्यंतचा सगळा प्रवास दाखवण्यात आला आहे. हा व्हीडीओ पाहून दलजितला खूप प्रेरणा मिळाली आणि तिने या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिने लिहिले आहे की, “तुझ्या हिंमतीमुळे मला प्रेरणा मिळाली आहे हिना. तु सध्या ज्या परिस्थितीमधून जात आहेस तो प्रवास पाहून माझं दु:ख छोटं वाटत आहे. या गोष्टीला खूप सामान्य समजण महत्त्वाचं आहे. तू खूप प्रेरणादायी आहेस आणि राहशील. तू लवकरच बरी होशील आणि असेच पुन्हा एकदा अवॉर्ड सोहळ्यामध्ये पुन्हा एकदा अवॉर्ड घेण्यासाठी येशील”.
हिनाचे कर्करोगावर उपचार सुरु झाले असून ती याबद्दलची माहिती वेळोवेळी तिच्या चाहत्यांना देत असते. ती लवकरच बरी व्हावी अशी प्रार्थना तिचे चाहते व मित्रपरिवार करत आहेत. हिनाचे हॉस्पिटलमधीलही अनेक फोटो समोर आले आहेत.