Ankita Lokhande emotional post : हिंदी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अंकिता लोखंडे. मालिकाविश्वातील हा लोकप्रिय चेहरा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असलेली पाहायला मिळाली. अंकिताने आजवर तिच्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं. सोशल मीडियावरही ती बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती पती विकी जैन वा तिच्या मित्र परिवाराबरोबर आणि कुटुंबाबरोबरचे अनेक व्हिडीओ शेअर करत असते. अशातच आता अभिनेत्री अंकिता लोखंडेने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर वडिलांच्या आठवणीत पोस्ट शेअर केली आहे.
१२ ऑगस्टला तिचे वडील शशिकांत लोखंडे यांचं निधन झालं. त्यांनी ६८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. वडिल्याच्या निधनानंतर तिला खूप मोठा धक्का बसला होता. तिचं वडिलांबरोबर खूप घट्ट नातं होतं. सोशल मीडियावर तिने शेअर केलेल्या वडिलांसंबंधीत पोस्टवर चाहत्यांकडून नेहमी प्रेम मिळायचं. नुकतीच वडिलांच्या आठवणीत अंकिताने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने वडिलांबरोबरचे खास फोटो शेअर केले आहेत.
अंकिता वडिलांसाठी भावुक पोस्ट शेअर करत म्हणाली, “काही जखमा कधीच भरुन निघत नाही. तुम्ही फक्त त्याबरोबर जगत असता. दोन वर्षे झाली पण अजूनही सगळे तसंच आहे. तुमच्यासारखे वडील मला मिळाले यासाठी मी खूप भाग्यवान आहे. तुम्ही माझे हिरो होतात, तुम्ही माझे मित्र होतात, तुम्ही माझा सगळ्यात मोठा आधार होतात. आता आमच्याकडे फक्त आठवणी उरल्या आहेत; पण त्यांच्या आशीर्वादाबरोबर मी पुढे जात राहीन”.
अभिनेत्री पुढे म्हणाली, “माझे वडील होण्यासाठी धन्यवाद. मी, अर्पण आणि आई आम्हाला तुमची खूप आठवण येते. असा एक ही दिवस नसतो, जेव्हा आम्हाला तुमची आठवण आलेली नसते. ज्यांनी त्यांच्या जवळच्या व्यक्तीला गमावलं आहे, त्यांनी लक्षात ठेवा दुःख कधीच कमी होत नाही, आपण त्याबरोबरच पुढे जात असतो”. अभिनेत्रीच्या वडिलांना जाऊन दोन वर्ष झाली आहेत आणि आजही तिला वडिलांची आठवण सतावत आहे. अभिनेत्रीने तिच्या वडिलांच्या आठवणींना पोस्टद्वारे उजाळा दिला आहे.





