मुंबईसह देशभरात दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. सर्वत्र या सणाचा माहोल पाहायला मिळत असून संपूर्ण परिसर विद्युत रोषणाईने सजलेला आहे. केवळ सर्वसामान्यच नव्हे, तर कलाकार मंडळींमध्ये दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. सोशल मीडियाद्वारे हे कलाकार त्यांच्या चाहत्यांबरोबर दिवाळीचा आनंद साजरा करताना दिसत आहे. लोकप्रिय मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितही तिच्या चाहत्यांसह दिवाळी साजरी करताना दिसत आहे. यातच तिने केलेल्या एका पोस्टची सध्या बरीच चर्चा होताना दिसत आहे. (Tejaswini Pandit share a photo on Deepotsav)
मुंबईच्या दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर मनसे पक्षाकडून दरवर्षी दीपोत्सवाचे आयोजन करण्यात येतं. या दीपोत्सवाचे हे ११ वे वर्ष असून यानिमित्ताने परिसरात आकर्षक दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला अनेक मराठी कलाकारांसह बॉलिवूड कलाकारांनीदेखील हजेरी लावली होती. रविवारी लक्ष्मीपूजनानिमित्त तेजस्विनीने या परिसराला भेट दिली होती. यावेळी दीपोत्सवानिमित्त केलेली दिव्यांची लखलखाट पाहून अभिनेत्री भारावली आणि तिने राज ठाकरेंसाठी एक खास पोस्ट केली.
हे देखील वाचा – Video : पारंपरिक लूक, लेकांना उटणं लावलं अन्…; देशमुखांच्या सूनेचे संस्कार पाहून चाहतेही भारावले, जिनिलीयाचा दिवाळी पहाटचा व्हिडीओ चर्चेत
तेजस्विनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या दीपोत्सवाचे काही फोटोज शेअर केले. ज्यातील पहिल्या फोटोत राज ठाकरे त्यांच्या घरातील बाल्कनीत पाठमोऱ्या पद्धतीने उभे असून ते या दीपोत्सवाचा आनंद घेताना दिसत आहे. तसेच या फोटोला तिने एक कॅप्शन देत राज ठाकरे यांचे आभार मानले. ती यात म्हणाली, “‘दीपोत्सव २०२३’ या अनुभवासाठी खूप खूप धन्यवाद साहेब! हे सगळं तुम्हीच करू जाणे.”. तर दुसऱ्या फोटोमध्ये ती दीपोत्सवातील एका ठिकाणावर उभी आहे. तेजस्विनीने शेअर केलेल्या या फोटोंची सध्या बरीच चर्चा होताना दिसत आहे.
हे देखील वाचा – Jhimma 2 Trailer : लक्षवेधी संवाद, धमाल कॉमेडी अन्…; ‘झिम्मा २’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, निर्मिती सावंत भलत्याच भाव खाऊन गेल्या आणि…

तेजस्विनीने आजवर अनेक मराठी मालिका व मालिकांमध्ये काम करत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. शिवाय, ती विविध कारणांमुळे देखील चर्चेत आली होती. काही दिवसांपूर्वी तेजस्विनीने टोलसंदर्भात मुद्दा उचलताना देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्याची बरीच चर्चा झाली होती. तसेच, राज ठाकरेंबरोबरच्या भेटीची भरपूर चर्चा झाली होती. ती लवकरच प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटात मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.