गुरूवार, जून 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“पूर्णा आजीला रिप्लेस करु नका”, ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर लेकीही भावुक, म्हणाल्या, “किती प्रेक्षक जोडले…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 21, 2025 | 10:51 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
jyoti chandekar daughter emotional post

"पूर्णा आजीला रिप्लेस करु नका", ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर लेकीही भावुक, म्हणाल्या, "किती प्रेक्षक जोडले…"

tejaswini pandit mother passed away : ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांनी १६ ऑगस्ट रोजी वयाच्या ६९ व्या वर्षी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच मराठी कलाकारांसह चाहत्यांना ही मोठा धक्का बसला. अभिनेत्री ज्योती चांदेकर यांनी मराठी मालिका, नाटक, सिनेमा अशा तीनही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. ज्योती चांदेकर यांच्या पश्चात दोन मुली आहेत. पोर्णिमा पंडित-पुलन आणि लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडित. ज्योती चांदेकर या तेजस्विनी पंडितच्या आई होत्या. आईच्या निधनानंतर तेजस्विनी पूर्णतः कोलमडून गेलेली पाहायला मिळाली. तर ज्योती यांची दुसरी लेक पोर्णिमाने आईच्या आठवणीत भावनिक पोस्ट इंस्टाग्रामद्वारे शेअर केली आहे.

पौर्णिमा आणि तेजस्विनीने पोस्ट शेअर करत असं म्हटलं की, “मी, प्रेक्षक आणि ज्योती चांदेकर-पंडित (आई). मला कळायला लागलं त्या वयापासून आपली आई बाकीच्या मित्र-मैत्रिणींच्या आयांपेक्षा वेगळी आहे हे हळू हळू कळू लागलं होतं. आई मला आणि तेजूला कधीच पुरायची नाही, तिचा हवा तेवढा सहवास मिळायचा नाही म्हणून मी आईच्या नाटकांना जायचे. विंगेमधून प्रेक्षक किती आलेत हे छोट्याशा फटीतून लपून बघायचे आणि नेहमी ती गर्दी बघून मला आश्चर्य वाटायचं की माझ्या आईला बघायला एवढे लोक येतात. वर्दी वाले आणि नाटकसिनेमामध्ये काम करणारे घरी कधी येतील याचा पत्ताच नसतो असं माझी आज्जी म्हणायची”.

आणखी वाचा – भिती वाटायची, मुलगाही बरोबर राहत नाही आणि…; वयाच्या ७९व्या वर्षीही एकट्याच राहतात उषा नाडकर्णी, म्हणाल्या…

View this post on Instagram

A post shared by Poornima(Pour-knee-maa) Pullan (@lilmissscute)

पोस्टमध्ये तिने पुढे लिहिलं, “तेव्हा आपली आई या प्रेक्षकांना छान वाटावं म्हणून तिची कला सादर करत कायम दौऱ्यांवर असते आणि आपल्यापासून लांब असते हे डोक्यात बसलं होतं. माझ्याहीपेक्षा जास्त प्रेक्षकांचं आईवर प्रेम आहे हे मला एक मुलगी म्हणून कधीच पटलं नाही. पण आई आता गेली, अशी अचानक आम्हाला सोडून गेली आणि माझा हा विचार अलगद पुसून गेली. पूर्वी नाटक, नंतर सिनेमा आणि आता वयाच्या या टप्प्यात मालिकांमधील प्रेक्षक आणि प्रेम करणारा वर्ग हा वर्षानुवर्षे वाढतच गेला. माझ्या आणि तेजूच्या जवळच्या माणसांनी, कुटुंबाने आम्हाला खूप साथ दिलीच पण तिच्यावर भरभरुन प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांनी जो प्रेमाचा वर्षाव केलाय तो शब्दात मांडणं कठीण” .

आणखी वाचा – बसमधील दूधवाल्याने घट्ट पकडलं आणि…; बॅड टचबाबत भारती सिंगच धक्कादायक भाष्य, म्हणाली, “मला समजलं नाही…”

पुढे तिने म्हटलं, “अजूनही सोशल मीडियावर पूर्णा आजीला रिप्लेस करु नका, तिची जागा कुणीच घेऊ शकत नाही. पूर्णा आजी गावाला गेली आहे असं दाखवा हीच खरी श्रद्धांजली. असा कलाकार होणे नाही अश्या अगणित कमेंट्स पाहून आपल्या आईने काय कमावून ठेवलं. किती प्रेक्षक जोडले आहेत याची प्रचिती आली. आता पटतंय, कलाकार हा आधी प्रेक्षकांचा असतो, मग घरच्यांचा असतो. माझी आई म्हणजे ज्योती चांदेकर- पंडित. एक रंगकर्मी,कलाकार. अनेक संकटांमधून वाट काढत ती तिचं आयुष्य थाटात जगली. रूबाबात राहिली, माणसं जोडली, नाती बनवली, प्रेम वाटलं आणि प्रेम मिळवलं. या दुःखात आमच्याबरोबर उभ्या राहिलेल्या आमचा आधार झालेल्या सर्व कुटुंबियांचे, मित्र परिवाराचे आणि प्रेक्षकांचे मनापासून आभार – पोर्णिमा पंडित”.

Tags: entertainmentJyoti chandekar deathtejaswini pandit
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Neena Gupta Body Shaming

"शॉर्ट्स वाली देशी लाडकी", ६६ वर्षीय नीना गुप्ता तोकडे कपडे घालण्यावरुन ट्रोल, नेटकऱ्यांना उत्तर देत म्हणाल्या, "चांगले शरीर नाही म्हणून…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.