अनेक हिंदी कलाकार मराठी चित्रपटात आपला जम बसवत आहेत. मराठी मध्ये अनेक वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट येतात आणि ते प्रेक्षकांच्या पसंतीस देखील उतरत आहेत. ब्लॉकबस्टर दिग्दर्शक अशी ज्यांची ओळख आहे ते रोहित शेट्टी पहिल्यांदाच मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आले आहेत. ‘स्कूल कॉलेज आणि लाइफ’ असे या मराठी चित्रपटाचे नाव असून याची निर्मिती सुद्धा रोहित शेट्टी यांची आहे. नुकतंच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. (rohit shetty tejaswi prakash)
पहा तेजस्वी प्रकाशचा रोहित शेट्टीसोबतचा नवा सिनेमा (rohit shetty tejaswi prakash)
चित्रपटाचा ट्रेलर पोस्ट करत रोहित शेट्टीने पोस्ट शेअर करत लिहिले आहे की, माझे मराठी प्रेक्षक मला नेहमी विचारायचे की तू मराठी चित्रपट कधी बनवणार आहेस?… तर तो हा आहे…माझ्या मराठी प्रेक्षकांसाठी माझा पहिला मराठी उपक्रम! रोहित शेट्टीचा चित्रपट नाही, तरीही रोहित शेट्टीचा चित्रपट. जीवनाचा एक तुकडा, गोड, साधी, हृदयाला भिडणारी कथा!
असे पोस्ट करत त्याने ट्रेलर शेअर केला आहे.

या चित्रपटात प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री तेजस्वी प्रकाश मुख्य भूमीकेत दिसणार आहे. त्यासोबतच चित्रपटात करण परब मुख्य नायक आहे. ‘स्कूल कॉलेज आणि लाइफ’ हा कौटुंबिक चित्रपट असून ट्रेलरमध्ये एक तरुण शालेय आणि महाविद्यालयीन जीवनातील आव्हाने आणि आनंद कशा प्रकारे सांभाळतो याचे हुबेहूब वर्णन करण्यात आले आहे.
====
====
तेजस्वीला पुन्हा एकदा मराठी चित्रपटात पाहणं रंजक ठरणार आहे. याआधी तेजस्वीने मन कस्तुरी रे चित्रपटात अभिनय बेर्डे सोबत मुख्य भूमिका साकारली होती. आता पुन्हा एकदा ती ‘स्कूल कॉलेज आणि लाइफ’ या रोहित शेट्टी यांच्या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तेजस्वीला मोठया पडद्यावर पाहण्यास प्रेक्षकही उत्सुक आहेत. (rohit shetty tejaswi prakash)
रिलायन्स एंटरटेनमेंटच्या सहकार्याने रोहित शेट्टी, पवित्रा गांधी आणि विवेक शाह निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन विहान सूर्यवंशी यांनी केले आहे. हा एंटरटेनर १४ एप्रिल २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्याकडे आता रसिक प्रेक्षकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
