मंगळवार, सप्टेंबर 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सिद्दार्थ मल्होत्रावर कोसळला दुःखाचा डोंगर, वडिलांच्या निधनाने अभिनेता भावुक, म्हणाला, “आम्हाला झोपेत सोडून गेलात…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 18, 2026 | 10:53 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Sidharth Malhotra father death

सिद्दार्थ मल्होत्रावर कोसळला दुःखाचा डोंगर, वडिलांच्या निधनाने अभिनेता भावुक, म्हणाला, "आम्हाला झोपेत सोडून गेलात…"

Sidharth Malhotra father death : अभिनेत्री प्रविणा देशपांडे यांच्या निधनानंतर आता बॉलिवूडमधून आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. सिद्धार्थ मल्होत्राचे वडील सुनील मल्होत्रा ​​यांचे निधन झाले आहे. १७ फेब्रुवारीचा दिवस एकाच वेळी तीन वाईट बातम्या घेऊन आला आहे. एकीकडे सलमानचे वडील सलीम खान यांना आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात आले असतानाच दुसरीकडे ‘रेडी’ चित्रपटात सलमानच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रवीणा देशपांडे यांचे निधन झाले. आणि त्याच दरम्यान सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांच्या निधनाची बातमी आली. १३ फेब्रुवारीला सिद्धार्थच्या वडिलांचे निधन झाले, मात्र ही माहिती आता समोर आली आहे. दरम्यान, सिद्धार्थने वडिलांसाठी एक भावनिक पोस्टही लिहिली असून स्ट्रोकमुळे त्याचे वडील व्हीलचेअरवर असल्याचे सांगितले.

‘हिंदुस्तान टाईम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, वडील सुनील मल्होत्रा यांच्या निधनाची बातमी समजताच सिद्धार्थ आणि कियारा अडवाणी तात्काळ दिल्लीला रवाना झाले. कुटुंबाच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, सुनील मल्होत्राचे अंतिम संस्कार झाले आहेत, परंतु सिद्धार्थ आणि कियारा आणखी काही दिवस दिल्लीत कुटुंबासोबत राहतील. वडिलांच्या निधनाने सिद्धार्थला मोठा धक्का बसला आहे. तो त्याच्या वडिलांच्या खूप जवळ होता. सूत्राने सांगितले की, सिद्धार्थने त्याच्या दु:खाबद्दल कोणालाही सांगितले नाही आणि तो एकटाच त्याच्या कुटुंबासोबत वडील गमावण्याच्या दु:खाशी झुंज देत आहे.

आणखी वाचा – ‘तस्करी’ फेम मराठी अभिनेत्रीचे कर्करोगाने निधन, वयाच्या ६० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सलमान खानसह केलेलं काम

View this post on Instagram

A post shared by Sidharth Malhotra (@sidmalhotra)

दरम्यान, सिद्धार्थने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आपल्या वडिलांची आठवण करुन देणारी पोस्ट लिहिली आहे. त्याने आपल्या वडिलांसोबत बालपणापासून तारुण्यापर्यंत घालवलेल्या सुंदर आणि संस्मरणीय क्षणांची ९ छायाचित्रे शेअर केली आहेत. तसंच लिहिलं आहे की, “त्यांनी आपलं आयुष्य अशा मूल्यांसोबत जगलं जे कधीही झुकले नाहीत. त्यांच्यात शिस्त होती, पण कठोरपणा नव्हता. ताकद होती पण अहंकार नव्हता. जीवनातील सर्व अडचणींमध्येही सकारात्मक राहा. मर्चंट नेव्ही कॅप्टन म्हणून समुद्राला कमांड देण्यापासून ते शांत धैर्याने आजाराला तोंड देण्यापर्यंत, त्यांनी कधीही तडजोड केली नाही, कधीही आपली प्रतिष्ठा गमावली नाही. स्ट्रोकमुळे त्यांना व्हीलचेअरवर बसावे लागले तेव्हाही त्यांचा उत्साह कायम होता”.

आणखी वाचा – राखीने पुन्हा ‘बिग बॉस’ची प्रॉपर्टी तोडली; प्राजक्तावर पीठ फेकलं, खुर्ची पाडली अन्…; घरात मोठा राडा

सिद्धार्थ मल्होत्राने पुढे लिहिले की, “पप्पा, तुमचा प्रामाणिकपणा हा माझा वारसा आहे. tumchi शक्ती मला दररोज मार्गदर्शन करते. तुमची सकारात्मकता आजही या कुटुंबाला एकत्र ठेवते. तुम्ही आम्हाला झोपेत शांतपणे सोडून गेलात, पण तुमच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली आहे. मी जो काही आहे तो तुमच्यामुळेच आहे. आणि मी नेहमी तुमचे नाव, तुमचे मूल्य आणि तुमचा प्रकाश पुढे नेईन. लव्ह यू बाबा”.

Tags: bollywood newsSidharth MalhotraSidharth Malhotra father death
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
 Badshah and Isha Rikhi announced Divorce
Entertainment

पाच महिन्यानंतच संसार मोडला, सुप्रसिद्ध गायकाचा घटस्फोट, लग्नापूर्वी चार वर्ष केलं एकमेकांना डेट अन्…

सप्टेंबर 1, 2026 | 7:58 am
Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Next Post
Kiran Rao health update

आमिर खानच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीची तब्येत बिघडली, घरीच सुरु आहेत उपचार, पोस्ट करत म्हणाली, "खूप सांधेदुखी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.