‘Bigg Boss Marathi 6’ Promo : ‘कलर्स मराठी’ वरील ‘बिग बॉस मराठी ६’चा घराचा आजचा तिसरा दिवस पण ‘बिग बॉसच्या घरात वादाची ठिणगी मात्र पहिल्याच दिवसापासून पडली आहे. पहिल्याच दिवशी तन्वीसोबत झालेला राडा आणि त्यानंतर प्रभू शेळकेसोबत झालेली खडाजंगी यांमुळे रुचिता जामदार सध्या घराच्या केंद्रस्थानी आहे. अशातच आता समोर आलेल्या एका नव्या प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बिग बॉसच्या घरातील खेळाला कलाटणी देणारी ‘पॉवर की’ एका विशिष्ट टास्कदरम्यान महत्त्वाची भूमिका बजावताना दिसत आहे. बिग बॉस रुचिताला सांगताना दिसत आहेत पॉवर चेंबरमध्ये येण्यासाठी पॉवर की गरजेची आहे. मात्र, या ‘पॉवर की’ चा वापर करताना रुचिताकडून काहीतरी मोठी चूक घडल्याचे संकेत मिळत आहेत.
प्रोमोमध्ये ‘बिग बॉस’ रुचिताला ‘पॉवर की’ चेंबरमध्ये जाण्यासाठी ‘पावर की’ची गरज असल्याचं सांगतात. मात्र ही पावर की सध्या करणकडे असल्याचं समोर येतं. रुचिता करणकडे जाऊन ‘पॉवर की’ मागताना दिसते. पण करण स्पष्टपणे नकार देतो आणि म्हणतो, “नाही, मी तुला चावी देऊ शकत नाही.” यावर रुचिता भावुक होत म्हणते, “करण, माझ्या स्वप्नासोबत किमान खेळू नकोस.” मात्र करण ठाम राहतो आणि उत्तर देतो, “हे तू बिग बॉसला सांग, की चावी करणकडेच आहे.” पुढे रुचिता करणसमोर विनवणी करताना दिसते. पण करण कोणत्याही परिस्थितीत चावी द्यायला तयार होत नाही. खरंतर ग्रँड प्रीमियरमध्ये शॉर्टकट निवडलेल्या स्पर्धकांना रितेश देशमुखने ही ‘पॉवर की’ दिली होती. या चावीच्या मदतीनेच स्पर्धकांना घरात महत्त्वाच्या पॉवर्स मिळणार होत्या. ‘बिग बॉस’चा नियम अगदी स्पष्ट आहे. ‘पॉवर की’ दुसऱ्याच्या ताब्यात गेली, की तुमची पॉवरही गेली. आता घरात तिसऱ्या दिवशी नॉमिनेशन प्रक्रिया होण्याची शक्यता आहे. त्यासाठी शॉर्टकट निवडलेल्या स्पर्धकांकडे स्वतःची ‘पॉवर की’ असणं अनिवार्य आहे. मात्र रुचिताची पावर की करणकडे असल्यामुळे तिचं स्वप्न धोक्यात आलं आहे. (‘Bigg Boss Marathi 6’ Promo)
आता ही ‘पॉवर की’ रुचिताला वाचवणार की तिला थेट अडचणीत टाकणार? या चुकीमुळे तिला घरातील कामांची शिक्षा मिळणार की नॉमिनेशनमध्ये जावं लागणार, हे पाहणं रंजक ठरेल. करणने पॉवर की’ देण्यास नकार दिला, ‘बिग बॉस’ यांना सांग ‘पॉवर की’ करणने घेतली आहे. रुचिता त्याच्या पाया पडताना, त्याची माफी मागताना दिसत आहे. रितेश देशमुखच्या ‘लयभारी’ स्टाईलमध्ये सुरू झालेला हा सीझन आता हळूहळू ‘डेंजर’ वळण घेऊ लागला आहे. आज रात्री ८ वाजता ‘कलर्स मराठी’ वर आणि कधीही ‘जिओहॉटस्टार’ वर कधीही. (‘Bigg Boss Marathi 6’ Promo)



