छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. या मालिकेची लोकप्रियता आजही कायम आहे. या मालिकेसह मालिकेतील कलाकारांनीही प्रेक्षकांच्या मनात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. अशातच काही दिवसांपूर्वी या मालिकेतील अंजली भाभी म्हणजेच अभिनेत्री नेहा मेहताने अचानक मालिकेतून निरोप घेतला. तिच्या या मालिकेतेल अचानक एक्झिटबद्दल आजही अनेक गुपिते आहेत. नेहा बऱ्याच दिवसांपासून मनोरंजन क्षेत्रापासून लांब आहे मात्र ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये अंजलीची भूमिका साकारणाऱ्या नेहा मेहताने ही मालिका सोडल्याच्या सहा महिन्यांनंतर तिच्या मालिका सोडण्याविषयीची कारण सांगितले होते. “मी खूप सन्माननीय जीवन जगते आणि कोणत्याही गोष्टीची तक्रार करण्यावर माझा विश्वास नाही. मी ‘तारक मेहता…’ ही मालिका सोडण्यापूर्वी १२ वर्षे अंजली म्हणून काम केले. पण माझे गेल्या सहा महिन्यांचे पैसे थकीत आहेत. मालिका सोडल्यानंतर मी त्यांना माझ्या थकबाकीबाबत अनेकदा फोन केला. मला तक्रार करायला आवडत नाही. आशा आहे की, यावर लवकरच तोडगा निघेल आणि मला माझे कष्टाचे पैसे मिळतील” असं म्हणत तिने मालिका सोडण्याचे कारण सांगितले होते.
आणखी वाचा – ‘देवयानी’ व ‘गोठ’ या मालिकांमधून गाजलेल्या कलाकारांचे कमबॅक, नव्या मराठी मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार
नेहा मेहताने तारक मेहताच्या पत्नी अंजलीची भूमिका साकारली होती. २०२० मध्ये त्याने वैयक्तिक कारणे सांगून मालिकेतून निरोप घेतला होता. यावेळी तिने एका मुलाखतीत तिला आता नवीन माध्यम शोधायचे असल्याचे तिने सांगितले होते. तसेच नेहाने खुलासा केला होता की, तिला काही नवीन संधी येत होत्या पण इतर कामामध्ये व्यस्त असल्यामुळे तिला ‘तारक मेहता…’ मालिकेतून प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लगला.
अंजलीला गेल्या अनेक वर्षात टीव्हीवर दुसरा कोणताही कार्यक्रम मिळाला नसेल, पण तिने यापूर्वी एक गुजराती चित्रपट केला आहे. तसेच ती तिच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये व्यस्त असून ती टीव्ही व ओटीटीवरील काही चांगल्या संधीची वाट पाहत आहे.
अंजलीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, सुरुवातीला ती न्यूयॉर्कमध्ये फिल्म मेकिंगचा अभ्यास करणार होती. पण जेव्हा तिला ‘तारक मेहता..’मधील अंजली भाभीच्या भूमिकेविषयी व मालिकेत अभिनय करण्याविषयी विचारण्यात आले तेव्हा तिने आपला विचार बदलला. तसेच ती आता देवभक्ती करत असल्याचेही तिच्या सोशल मीडियावरील फोटोमधून दिसून येते. त्यामुळे सर्वांची आवडती अंजली भाभी आता कोणत्या नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार? याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.