‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय टीव्ही मालिकेमधील सोढी पात्राने प्रसिद्ध झालेले गुरुचरण सिंह गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. २२ एप्रिल रोजी अभिनेता अचानक बेपत्ता झाला. यानंतर केवळ चाहतेच नाही तर त्यांचे पालकही चिंतेत पडले आणि अखेर २५ दिवसांनंतर स्वत: गुरुचरण सिंह यांनी घरी परतले असून यामुळे सर्वांनाच धक्का बसला. यादरम्यान, त्यांच्याविषयीच्या अनेक बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्याच्या पाहायला मिळाल्या. अशातच आता स्वत; गुरुचरण सिंह यांनी स्वत: त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
एबीपीच्या वृत्तानुसार, गुरुचरण सिंह घरी परतल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्याची तब्येत ठीक नव्हती. याबद्दल अभिनेता असं म्हणाला की, “मी आता बरा आहे. माझी तब्येत चांगली आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी मला भयंकर डोकेदुखीचा त्रास होत होता. पण आता डोकेदुखी नियंत्रणात आहे आणि हळूहळू गोष्टी चांगल्या होत आहेत.” तसेच यावेळी त्याने त्याला अशक्तपणा असल्याचेही सांगितले आहे.
घरातून अचानक गायब झाल्याबद्दल गुरुचरण सिंहने असे म्हटले की, “मी अजूनही न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करत आहे. त्यामुळे मला याबद्दल उघडपणे बोलण्यापूर्वी काही गोष्टी पूर्ण करायच्या आहेत. एकदा का हे बंद झाले की मग मी यावर नक्की बोलेन. माझ्या बेपत्ता होण्याबद्दलच्या काही औपचारिकता अजून बाकी आहेत. दरम्यानच्या काळात निवडणुका सुरु होत्या. त्यामुळे तोपर्यंत मी वाट पाहण्याचा विचार केला. लवकरच हे न्यायालयीन कामकाज पूर्ण करावे लागेल”.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या भावाची लगीनघाई, लग्नापूर्वीच्या पारंपरिक विधींने वेधलं लक्ष, व्हिडीओ व्हायरल
अभिनेता नुकताच त्याच्या घरी परतला. याबद्दल ‘आज तक’च्या वृत्तानुसार, अभिनेत्याने खुलासा केला की, तो धार्मिक यात्रेला गेला होता. संसाराचा त्याग करुन तो घरातून निघून गेला. या २५ दिवसांत तो कधी अमृतसर तर कधी लुधियाना येथे होता. यावेळी त्याने अनेक शहरांतील गुरुद्वारांमध्ये मुक्काम केला होता.
दरम्यान, ‘तारक मेहता…’ निर्माते असित कुमार मोदी यांनीही नुकतेच गुरुचरण सिंहच्या पुनरागमनाबद्दल सांगितले. यावेळी ते असं म्हणाले की, “आता त्याच्या मनात काय आहे ते समजू शकत नाही, त्याला काय वाटत आहे हे आम्हाला माहित नाही. मी त्याला फोन करण्याचा प्रयत्न करत आहे. मला त्याच्याशी बोलायचे आहे”.