शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : भारताच्या विजयानंतर मैदानातूनच बायको, मुलांना विराट कोहलीचा व्हिडीओ कॉल, ‘तो’ क्षण कॅमेऱ्यामध्ये कैद, लेकीने व्यक्त केली काळजी

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 30, 2024 | 11:30 am
in Trending
Reading Time: 5 mins read
google-news
T20 World Cup Final 2024

Video : भारताच्या विजयानंतर मैदानातूनच बायको, मुलांना विराट कोहलीचा व्हिडीओ कॉल, ‘तो’ क्षण कॅमेऱ्यामध्ये कैद, लेकीने व्यक्त केली काळजी

 T20 World Cup Final 2024 : टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताने शानदार विजय मिळवल्याने देशभरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा आनंद सगळेजण साजरा करताना दिसत आहेत. या ऐतिहासिक विजयासाठी सर्वच जण आनंदी आहेत. अभिषेक बच्चन, अनन्या पांडे, रवीना टंडन, अजय देवगण यांसारख्या बॉलीवूड कलाकारांनीही टीमचे अभिनंदन केले आहे, तर अनुष्का शर्मानेही तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन तिच्या पतीसाठी एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे.

अनुष्का शर्माने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले आहे की,“आमच्या मुलीने आज सामना संपल्यावर या सगळ्या खेळाडूंना टीव्हीवर रडताना पाहिलं. यावेळी या खेळाडूंना धीर देण्यासाठी तिथे कोणी असेल का?, असा प्रश्न तिने विचारला. मी तिला म्हणाले, हो डार्लिंग. कारण, आज जवळपास १.५ बिलियन प्रेक्षकांनी आपल्या खेळाडूंना मिठी मारली आहे. आपल्या टीमने अभूतपूर्व विजय मिळवला आणि सगळ्यांनी या सामन्यांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. चॅम्पियन्स अभिनंदन”, असं म्हणत तिने साऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा – सत्य समजताच अहिल्यादेवींचा राग अनावर, आदित्यला आई म्हणण्यास दिला नकार, पारूलाही सुनावलं अन्…

View this post on Instagram

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

तर खास विराटसाठी पोस्ट शेअर करत तिने असंही म्हटलं आहे की, “माझं या माणसावर खूप प्रेम आहे. विराट कोहली. तू माझा आहेस हे सांगताना मला प्रचंड आनंद होतो. आता हा आनंद साजरा करण्यासाठी माझ्यासाठी स्पार्कलिंग वॉटर घेऊन ये”. नकुल मेहता, प्रियांका चोप्रा, भूमी पेडणेकर, फुक्रा इन्सान आणि इतरांनी या पोस्टवर रेड हार्ट इमोजी शेअर करत पसंती दर्शिविली आहे.त्याचवेळी, ती क्लिप देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये विजयानंतर विराट कोहलीने अनुष्का शर्मा, मुलगी वामिका आणि मुलगा अकाय यांना व्हिडीओ कॉल केला आहे आणि त्यांच्याशी बोलत आहे. आणि तो प्रत्येक सामन्यानंतर असे करतो. ज्याला पाहून सगळेच त्याचे चाहते होतात. यादरम्यान विराट त्यांना फ्लाइंग किसही देत ​​आहे.

View this post on Instagram

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

आणखी वाचा – प्रभास-दीपिकाच्या ‘कल्की २८९८ एडी’ची बॉक्स ऑफिसवर जादू, ‘या’ चित्रपटांचे मोडले रेकॉर्ड, दोन दिवसांत तब्बल इतकी कमाई

Virat Kohli on a call with his lovely wife Anushka Sharma and his kids. ♥️#INDvSA #INDvsSA #INDvsSA2024 #INDvsSAFinal #INDvSAFinal #ViratKohli𓃵 pic.twitter.com/ooZi57qgb0

— 𝐀𝐧𝐤𝐢𝐭 𝐒𝐡𝐚𝐫𝐦𝐚 𝕏(𝓥𝓲𝓻𝓪𝓽¹⁸ Fan) (@Ankit_S1111) June 29, 2024

विराट कोहलीने T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून निवृत्ती जाहीर केली आहे. २९ जून रोजी झालेल्या T20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करुन ट्रॉफीवर विजय मिळवला आणि दुसरा T20 विश्वचषक जिंकला. या विजयाबद्दल कार्तिक आर्यन, अर्जुन रामपाल, रुपाली गांगुली, अजय देवगण आणि इतर कलाकार सोशल मीडियावर टीम इंडियाचे अभिनंदन करत आहेत.

Tags: anushka sharmaanushka sharma familyentertainmentT20 World Cup Final 2024virat kohli
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Appi Amchi Collector

अप्पी-अमोलसाठी अर्जुनचा मोठा निर्णय, त्यांच्याबरोबर राहण्यासही तयार झाला, हा विश्वासघात आर्याला सहन होईल का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.