मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील सराटी येथे आमरण उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना शुक्रवारी (२ सप्टेंबर) घडली. या घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले असून अनेकांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. अश्विनी महांगडे, हेमंत ढोमे यांसारख्या मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकारांनीही याप्रकरणी सोशल मीडियाद्वारे आपला संताप केला आहे. अशातच ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिनेदेखील या प्रकारावर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. (Prajakta Gaikwad on Jalna Lathi Charge Incident)
मराठीतील अनेक कलाकार मंडळी विविध मुद्द्यांवर सोशल मीडियाद्वारे व्यक्त होतात. राजकीय असो किंवा सामाजिक, अनेक मुद्द्यांवर उघडपणे भाष्य करण्यास कलाकार पुढे सरसावतात. प्राजक्ता गायकवाड सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ती तिचे अनेक फोटोज शेअर करण्याव्यतिरिक्त ती अनेक मुद्द्यांवर स्पष्ट मत व्यक्त करते.
हे देखील वाचा – नृत्यांगना गौतमी पाटीलवर कोसळला दुःखाचा डोंगर, वडिलांचे निधन, पुण्यात उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
अशीच एक पोस्ट प्राजक्ताने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर केली आहे. ज्यात तिने जालन्यातील लाठीचार्ज प्रकरणावर आपला संताप व्यक्त केला आहे. प्राजक्ताने ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील एका सीनचा फोटो शेअर केला, ज्यामध्ये ती रागाने बघत आहे. या फोटोसह शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हणाली, “रक्त उसळलंय… रक्त पेटलंय….????⛳”. तिच्या या पोस्टवर चाहते व नेटकऱ्यांनी कमेंटद्वारे विविध प्रतिक्रिया देत आहे.
हे देखील वाचा – मराठी मालिकेमधून काढून टाकण्यामागचं सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने सांगितलं कारण, खुलासा करत म्हणाली, “आजारी असल्यामुळे त्यांनी मला…”
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने याआधीही अनेक मुद्द्यांवर आपलं परखड मत व्यक्त केलं आहे. दरम्यान, मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह दहा जण आंदोलनाला बसले होते. पण, या आंदोलनाला ऐनवेळी गालबोट लागलं आणि ती घटना घडली. या घटनेनंतर कलाक्षेत्रासह अनेकांकडून भाष्य करण्यात येत आहे.