शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘या’ अभिनेत्रीसोबत काम करायचं होत पण… स्वप्नील जोशीची ती पोस्ट चर्चेत

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 23, 2023 | 7:32 am
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
swapnil joshi troll

swapnil joshi troll

अभिनेता स्वप्नील जोशी सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही शेअर करत असतो. मराठी मनोरंजन विश्वात तर स्वप्नीलला चॉकलेट बॉय म्हणून ओळखतात. सोशल मीडियावरील त्याचा वावर हा त्याच्या चाहत्यांनाही हवाहवासा वाटतो. त्याच्या चाहत्यांसाठी तो नेहमीच काही ना काही शेअर करत असतो. स्वप्नीलने ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात जजच्या भूमिकेत होता, मात्र त्याने तिथूनही काढता पाय घेतलाय. आता स्वप्नील सध्या ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत मुख्य भूमिकेत पाहायला मिळतोय. मालिकेच्या शूटिंगमध्ये स्वप्नील व्यस्त असला तरी तो सोशल मीडियावरून त्याच म्हणणं चाहत्यांसोबत नेहमीच शेअर करत असतो. त्याचे चाहतेही स्वप्नीलच्या पोस्टची वाट पाहत असतात.  (swapnil joshi troll)

बरेचदा स्वप्नील जोशीच्या फॅन्सकडून त्याची शाहरुख खानसह तुलना केलेली पाहायला मिळाली आहे. अशातच स्वप्नीलने शाहरुख खानच्या पाऊलावर पाऊल ठेवून सोशल मीडियावर चाहत्यांशी संवाद साधला. शाहरुखच्या #AskSRK प्रमाणे स्वप्नीलने सुद्धा #AskSJ असा हॅशटॅग पोस्ट केला होता. यावर चाहत्यांनी स्वप्नीलला अनेक प्रश्न विचारले व त्यानेही या प्रश्नांची परखड व प्रामाणिक उत्तर देत प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतला. यातील एका प्रश्नावर स्वप्नीलने आपल्या मनातील खंत चाहत्यांसोबत शेअर केली आहे.


#AskSJ हॅशटॅगवर एका चाहतीने स्वप्नीलला विचारले की, मराठी मनोरंजन सृष्टीत अशी एक कुठली (Actor or Actress) आहे ज्याच्यासह काम करायची तुझी इच्छा आहे पण अजून योग आला नाही ? यावर स्वप्नील म्हणाला की, मला स्मिता पाटील यांच्या बरोबर एक फ्रेम तरी शेअर करायला मिळायला हवी होती ! ती सल कायम राहिल माझ्या मनात! कारण दुर्दैवाने या योग आता कधीच येणार नाही.

नक्की काय आहे प्रकरण (swapnil joshi troll)

दरम्यान, या सत्रात स्वप्नीलने तू तेव्हा तशी मालिकेवरून टोमणे मारणाऱ्या व टीका करणाऱ्या अनेकांना चांगलेच बोल लावलेत, स्वप्नीलला चांगल्या मालिका करत जा असा सल्ला देणाऱ्या एका युजरला उत्तर देताना त्याने चांगलं काय हे कोण ठरवणार! असा उलट प्रश्न त्या युजरला केला. त्यावर कमेंट करत  चाहत्याने प्रेक्षक ठरवतील पण एक चांगला अभिनेता म्हणून तुला अशा मालिकेत पाहायला आवडत नाही”, असं म्हटलं आहे. यावर स्वप्निलने ‘नोंद घेतलीय’ अशी कमेंट केली आहे.

====

हे देखील वाचा- ऋता आणि प्रतीकचा नवीन प्रोजेक्ट?

=====

दरम्यान स्वप्नील जोशी ‘वाळवी’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत राहिला. त्याच्या भूमिकेचेही सर्वत्र कौतुक करण्यात आले. तर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगलीच कमाई केली.  (swapnil joshi troll)

Tags: its majjasmita patilswapnil joshitrollvaalvi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
Next Post
shiv thakare troll

ट्रोलिंगवर नेटकऱ्यांना प्रतिउत्तर करत शिवने शेअर केली पोस्ट

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.