शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“शेवटी न्याय मिळालाच नाही”, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या चार महिन्यांनंतर बहिणीची पोस्ट, म्हणाली, “या खटल्यामध्ये…”

Saurabh Moreby Saurabh More
जून 14, 2024 | 11:28 am
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Sushant Singh Rajput fourth death anniversary actor’s sister Shweta shared an emotional post in memory of her brother.

"शेवटी न्याय मिळालाच नाही", सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या चार महिन्यांनंतर बहिणीची पोस्ट, म्हणाली, "या खटल्यामध्ये..."

दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आकस्मिक निधनाने त्याच्या चाहत्यांसह मनोरंजन विश्वालाही मोठा धक्का बसला. सुशांतच्या निधनाला आता चार वर्ष पूर्ण होत आहेत. मात्र त्याच्या आत्महत्येच्या प्रकरणाचा तपास अद्याप अपूर्णच आहे. सुशांतची बहीण श्वेता सिंहने अनेकदा तिच्या भावाच्या आत्महत्येबाबत चौकशीची मागणी केली आहे. तसेच ती अनेकदा सुशांतबद्दलच्या तिच्या आठवणीही शेअर करत असते.

अशातच सुशांतची बहीण श्वेता सिंग कीर्तीने दिवंगत अभिनेत्याच्या चौथ्या पुण्यतिथीनिमित्त एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. आज सकाळी श्वेताने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटद्वारे सुशांत सिंह राजपूतचा एक न पाहिलेला व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये तो आपल्या बहिणींबरोबर खास वेळ घालवताना दिसत आहे. या व्हिडीओबरोबरचे तिने भावाच्या न्यायाची मागणीदेखील केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Shweta Singh Kirti (@shwetasinghkirti)

या पोस्टमध्ये सुशांत सिंहच्या बहिणीने असं म्हटलं आहे की, “भाई, तू आम्हाला सोडून गेलास याला आज ४ वर्षे पूर्ण झाली आहेत आणि १४ जून २०२०ला नेमकं काय घडलं? ते आम्हाला अजूनही कळलेले नाही. तुझा मृत्यू हे अजूनही एक गूढच आहे. पण मला आता असहाय्य वाटत आहे. मी सत्यासाठी अनेकवेळा अधिकाऱ्यांकडे विनंती केली आहे. पण मी आता माझा संयम गमावत आहे आणि मला आता हार मानावीशी वाटत आहे”.

View this post on Instagram

A post shared by Shweta Singh Kirti (@shwetasinghkirti)

आणखी वाचा – अस्तिकट्यार मिळवण्यासाठी नेत्रा-इंद्राणीचा रुपालीविरुद्ध नवीन प्लॅन, प्लॅनमध्ये रुपाली स्वत: फसणार? की राजाध्यक्षांनाच फसवणार?

यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “शेवटी मला या खटल्यात मदत करू शकणाऱ्या प्रत्येकाच्या हृदयावर हात ठेवून स्वतःला विचारावेसे वाटते की, माझा भाऊ सुशांत सिंहचे नेमके काय झाले? हे जाणून घेण्याची आमची लायकी नाही का? तो एक राजकीय अजेंडा बनला आहे का? त्या दिवशी नेमकं काय घडलं हे सांगण्याइतके सरळ असू शकत नाही का? कृपया, मी विनंती करत आहे की, एक कुटुंब म्हणून पुढे जाण्यास आणि आम्ही ज्यासाठी पात्र आहोत ते जाणून घेण्यात आमची मदत करा”.  

आणखी वाचा – उमेश कामतची एकाच वेळी दोन स्वप्नं पूर्ण, पोस्ट शेअर करत सांगितली आनंदाची गोष्ट, म्हणाला, “हाऊसफुल्ल…”

तसेच श्वेताने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने असं म्हटलं आहे की, “या क्रूर जगात इतके शुद्ध आणि प्रेमळ असणे ही त्याची चूक होती का? सुशांतवर अन्याय होऊन ४ वर्षे झाली. पण त्याला अजूनही न्याय मिळाला नाही. यासाठी तो खरंच पात्र आहे का?” दरम्यान, १४ जून २०२० रोजी सुशांत सिंह राजपूत त्याच्या मुंबईतील अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळला होता. काहींनी हा मृत्यू असल्याचे म्हटले होते तर काहींनी ही आत्महत्या असल्याचा संशय व्यक्त केला. तेव्हापासून त्याची बहीण त्याच्या न्यायासाठी लढत आहे.
Tags: bollywood actorSushant Singh Marathi Newssushant singh rajputSushant Singh Rajput Death Anniversary
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Next Post
Paaru Serial Promo

अहिल्यादेवी घरात नसताना दामिनीने घेतली त्यांची जागा, पारू आदित्यला फिरायला घेऊन गेल्यानंतर गनीलाही बेदम मारलं अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.