बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध चित्रपट ‘वॉन्टेड’ या चित्रपटातून अभिनेत्री आयेशा टाकिया अधिक प्रकाशझोतात आली. तिने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच ती काही म्युजिक सॉंगमध्येही दिसून आली. मात्र आता ती अभिनयापासून दूर असलेली पाहायला मिळते. मात्र सोशल मीडियावर ती अधिक सक्रिय असलेलीदेखील दिसून येते. सोशल मीडियावरुन ती तिच्या चाहत्यांशी संपर्क साधताना दिसते. आता नुकताच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिचा हा लूक बघून सगळ्यांनाच धक्का बसला आहे. यामध्ये तिच्या ट्रान्सफॉर्मेशनची नेटकरी खिल्लीदेखील उडवताना दिसत आहेत. (ayesha takia new look viral)
आयेशाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती निळ्या व सोनेरी रंगाच्या साडीमध्ये दिसून येत आहे. यावर तिने साजेसा असा मेकअप केला आहे. तसेच केस मोकळे सोडले आहेत. या लूकमध्ये आयेशाला ओळखणं खूप कठीण वाटत आहे. तिचा हा फोटों सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. एका नेटकऱ्याने लिहिले की, “तू तुझा चेहरा व नैसर्गिक सौंदर्याची वाट लावत आहेस”.
दुसऱ्या नेटककऱ्याने लिहिले की, “तू किती सुंदर होतीस, अशी का झाली आहेस”, तसेच अजून एकाने प्रतिक्रिया देत लिहिले की, “ही स्वतःला कायली जेनर समजत आहे”. त्यानंतर अजून एकाने लिहिले की, “एके काळी बॉलिवूडवर राज्य करत होतीस तू”. अशा सर्व प्रतिक्रिया आल्याने आयेशाचा नवीन लूक आवडला नसल्याचे समजत आहे.
आयेशाच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, तिने अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम केले आहे. यामध्ये ‘टारझन’, ‘दिल मांगे मोअर’, ‘सोचा ना था’, ‘शादी नं १’, ‘डोर’ व ‘पाठशाला’ या चित्रपटांचा समावेश आहे. तिच्या अभिनयाची अनेकांनी खूप स्तुती केली. तसेच तिच्या सौंदर्याचेचे देखील अनेक चाहते होते. मात्र अचानक ती मनोरंजन विश्वापासून दूर झालेली पाहायला मिळाली. २०११ साली ती ‘मोड’ या चित्रपटांमध्ये दिसून आली होती. सोशल मीडियावरही ती आपल्या कुटुंबासमवेत फोटों व व्हिडिओ शेयर करताना दिसते.