छोट्या पडद्यावर सध्या चर्चेत असलेल्या मालिकांमध्ये ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेचे नावदेखील अग्रक्रमी आहे. एका श्रीमंत घरात काम करण्यापासून सुरू झालेला गौरीचा प्रवास त्याच घराची मालकीण बनण्यापर्यंत कथा मालिकेत दाखवण्यात आली आहे. जयदीप-गौरी प्रमाणेच नित्या आणि अधिराज ही जोडीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मालिकेने लीप घेतल्यानंतर कथानकात काही नवीन पात्रे आली. मात्र शालिनी हे एक पात्र सारखेच राहिले. दीप-गौरीबरोबर शिर्के-पाटील कुटुंबांतील अनेक सदस्यांच्या मृत्यूला शालिनी जबाबदार होती. नव्या रुपात आणि नव्या मनसुब्यांसह शालिनी पुन्हा आली. (Madhavi Nimkar Appreciation By Fans)
मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांचा एक वेगळाच चाहतावर्ग असतो. रोज टीव्हीवर दिसणारे हे कलाकार प्रेक्षकांना आपले वाटत असतात. त्यामुळे या कलाकारांबाबतच्या प्रत्येक गोष्टी प्रेक्षक सोसजळ मीडियाद्वारे शेअर करत असतात. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील शालिनी म्हणजेच अभिनेत्री माधवी निमकरने खलनायिकेची भूमिका साकारली असली तरी तिची भूमिका आवडणारा एक वेगळाच चाहतावर्ग आहे. ही चाहते मंडळी सोशल मीडियाद्वारे तिच्याबद्दलच्या प्रत्येक अपडेट्स शेअर करत असतात. अशातच माधवीच्या एक फॅन पेजने माधवीच्या मालिकेतील एका सीनचा खास व्हिडीओ शेअर केला आहे.
आणखी वाचा – “माझ्या आईच्या साडीने पेट घेतला अन्…”, ‘नवरी मिळे…’ फेम लीलाने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “फटाक्यामुळे…”
माधवीच्या एक फॅन पेजने मालिकेतील एका नुकत्याच झालेल्या भागाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओखाली चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या व्हिडीओखाली एकाने कमेंट करत असं म्हटलं आहे की, “काहीपण म्हणा… जुनी शालिनीच खूप मस्त होती. तिची भाषा, तिच वागणं… पण माधवीचा अभिनय कमाल आहे. खरंच माधवी निमकर या ताईंना मी याआधी कधीच पाहिला नव्हता. पण या मालिकेमध्ये त्यांना पहिल्यांदा पाहिलं. खरंच खूप छान अभिनेत्री आहेत”.
तर आणखी एकाने शालिनी या पात्राचे कौतुक करत असं म्हटलं आहे की, “शालिनी या पात्राशिवाय मालिकेला काहीच मज्जा नसती आली. मालिकेत गौरी-जयदीप महत्त्वाचे आहेत, तेवढीच शालिनीसुद्धा खूप महत्त्वाची आहे. माधवी ताई तुझे खूप खूप कौतुक. शालिनी या पात्रामुळे मालिकेला खूप खूप रंगत आणली”. दरम्यान, शालिनी फेम माधवी निमकरनेदेखील या सर्वांचे आभार मानले आहेत. इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे माधवीने या सर्व चाहत्यांना धन्यवाद असं म्हटलं आहे.