सर्वसामान्य माणूस असो किंवा एखादे प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व. नवीन घर घेणे हे प्रत्येकाचेच स्वप्न असते. प्रत्येकाला वाटतं की, आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण तारेवरची कसरत करत असतो. गेल्या वर्षात मराठीतील अनेक कलाकारांनी त्यांच्या नावेन घर घेण्याची स्वप्नपूर्ती केली. अशातच नवीन वर्षाच्या प्रारंभीस आणखी एका लोकप्रिय अभिनेत्रीने तिचे नवीन घर घेण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. (Girija Prabhu On Instagram)
स्टार प्रवाह वाहिनी वरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ या मालिकेतील गौरी (आताची नित्या) अर्थात अभिनेत्री गिरिजा प्रभू हिने २०२४ या नवीन वर्षात तिचे नवीन घर घेण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियाद्वारे एक फोटो शेअर केला आहे. या फोटोद्वारे तिने तिच्या नवीन घराबद्दलची माहिती दिली आहे. गिरिजाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओही पोस्ट केला आहे. गिरिजाने कलश व देवाची प्रतिमा असलेला एक फोटो व व्हिडीओ शेअर केला आहे. या फोटोमुळे गिरिजाने नवीन घर घेतले असल्याचे म्हटले जात आहे.
गिरिजाने शेअर केलेल्या या फोटोवर मराठीतील अनेक कलाकारांनी कमेंट्स करत अभिनेत्रीचे कौतुक केले आहे. मराठीतील सोनाली खरे, समृद्धी केळकर, भक्ती रत्नपारखी, माधवी नेमकर, अमेय बर्वे, मेघन जाधव व हर्षदा खानविलकर यांसारख्या अनेक कलाकारांनी तिला अभिनंदन म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर गिरीजाच्या अनेक चाहते मंडळींनीही तिला कमेंट्समध्ये शुभेच्छा दिल्या आहेत व अभिनंदन म्हटले आहे.
दरम्यान, ‘सुख म्हणजे काय असतं?’ या मालिकेने लिप घेतली असून आता या मालिकेची नवीन कथा प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. मालिकेला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत असून यामधील गिरिजाचे ‘नित्या’ हे पात्रदेखील चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरत आहे.