शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सात बायकांच्या आयुष्यावर येणार आणखी एक कथा ,सुकन्या मोने, प्रार्थना बेहरे यांच्यासह स्वप्निल जोशी दिसणार मुख्य भूमिकेत

सौरभ जाधवby सौरभ जाधव
ऑगस्ट 15, 2023 | 1:39 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Sukanya Mone New Movie indradhanushya

Sukanya Mone New Movie indradhanushya

प्रेक्षकांच्या मनाला अनेक चित्रपट, मालिका आणि प्रेक्षक भुरळ पाडत असतात. मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांचा कल सध्या वाढताना दिसतोय त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस आले असं म्हणायला हरकत नाही. सैराट, वेड, बाई पण भारी देवा या चित्रपटांनी मराठी चित्रपटसृष्टी पुन्हा एकदा समृद्ध केली आणि आता अनेक चित्रपट, नाटक देखील प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
असाच आणखी एक चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या मनोरंजन करण्यासाठी येणार असल्याची बातमी समोर आली आहे. अभिनेत्री प्रार्थना बेहरे, सुकन्या मोने, स्वप्नील जोशी अशा तगड्या स्टार कास्ट सहित ‘इंद्रधनुष्य’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं शूटिंग देखील परदेशात सुरु झालं झाल्याचं सांगितलं आहे.(Sukanya Mone New Movie indradhanushya)

चित्रपटाची कथा एक पुरुष आणि सात बायका या कथानकावर आधारित असून अतिशय धमाल आणि मनोरंजक अशी आहे. लंडनमध्ये घडणाऱ्या या कथानकावरील चित्रपटाचं चित्रीकरण लंडनमध्ये सुरू झालं आहे. या चित्रपटामुळे अभिनेता स्वप्नील जोशी पहिल्यांदाच लंडनमध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणाचा अनुभव घेत आहे. पांडुरंग जाधव यांनी आतापर्यंत केलेले तीनही चित्रपट उत्तम गोष्ट सांगणारे असल्यानं “इंद्रधनुष्य” या चित्रपटातही त्यांच्या दिग्दर्शनाचे आणि सर्व स्टारकास्टच्या अभिनयाचे सप्तरंग दिसतील याची नक्कीच खात्री आहे.(prarthana behere)

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)


प्रार्थना बेहेरे, दीप्ती देवी, अदिती सारंगधर, सुकन्या मोने, नम्रता गायकवाड, नेहा खान, श्वेता पाटील अशी दमदार स्टारकास्ट असून चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त नुकताच करण्यात आला. आशिष अग्रवाल यांच्या एबीसी क्रिएशन्स या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून “इंद्रधनुष्य” चित्रपटाची निर्मिती करण्यात येत असून नितीन वैद्य चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन पांडुरंग जाधव, पटकथा पांडुरंग जाधव, विपुल देशमुख आणि संवादलेखन विपुल देशमुख यांचेच आहे. नागराज दिवाकर छायांकनाची, वरुण लखाते संगीत दिग्दर्शनाची तर निलेश गावंड संकलनाची जबाबदारी सांभाळणार आहेत.(Sukanya Mone New Movie indradhanushya)

Tags: prarthana behereSukanya Mone New Movie indradhanushya
सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Akshay Kumar got Indian Citizenship

स्वातंत्र्यदिनी अक्षय कुमारला मिळाले भारताचे नागरिकत्व, फोटो शेअर करत चाहत्यांना दिली आनंदाची बातमी म्हणाला, "मन आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.