बुधवार, जून 4, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

२० वर्षांनंतर ‘ऐतराज’ चित्रपटाचा सीक्वेल येणार, अक्षय कुमार-प्रियांका चोप्रा पुन्हा एकत्र दिसणार?, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 13, 2024 | 2:47 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Aitraaz Sequel Coming Soon

२० वर्षांनंतर 'ऐतराज' चित्रपटाचा सीक्वेल येणार, अक्षय कुमार-प्रियांका चोप्रा पुन्हा एकत्र दिसणार?,

Aitraaz Sequel Coming Soon : प्रियांका चोप्रा, अक्षय कुमार आणि करीना कपूर खान स्टारर ‘ऐतराज’चा सिक्वेल ‘ऐतराज २’ लवकरच मोठ्या पडद्यावर येणार आहे. चित्रपटाबाबतची ही आनंदाची बातमी निर्माता दिग्दर्शक सुभाष घई यांनी बुधवारी १३ नोव्हेंबर रोजी सकाळी दिली. सुभाष घई यांनी २००४ च्या सुपरहिट चित्रपट ‘ऐतराज’ ची झलक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामच्या माध्यमातून दाखवली. हा फोटो आहे ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा जोनसचा. ज्यामध्ये ती पांढऱ्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसत आहे.

या पोस्टमध्ये प्रियंका चोप्राचे जोरदार कौतुक करण्यात आले आहे आणि लिहिले आहे की, “बोल्ड व ब्युटीफुल प्रियंका चोप्राने धैर्य दाखवले आणि करुन दाखवले. त्यामुळेच २० वर्षांनंतरही ‘ऐतराज’मध्ये तिने साकारलेली व्यक्तिरेखा सिनेप्रेमी विसरु शकलेले नाहीत. ऐतराज माझ्या मुक्ता आर्ट्सने तयार केला आहे. सुरुवातीला ही भूमिका करताना प्रियांकाला संकोच वाटत होता, पण नंतर तिने पूर्ण आत्मविश्वासाने या महिलेचे पात्र साकारले”.

आणखी वाचा – Video : एक्स बॉयफ्रेंडचं लग्न होताच गाणं गाऊ लागली नेहा कक्कर, व्हिडीओ पाहून चाहतेही हैराण, चर्चांना उधाण

जुन्या ‘ऐतराज’चे क्षण आठवल्यानंतर चित्रपट निर्मात्याने ‘ऐतराज’चा दुसरा भाग जाहीर केला. याबाबत बोलताना निर्मात्यांनी लिहिले आहे की, “आता मुक्ता आर्ट्स तीन वर्षांच्या मेहनती आणि उत्कृष्ट स्क्रिप्टसह ‘ऐतराज २’साठी सज्ज आहे”. २००४ मध्ये प्रदर्शित झालेला, हा रोमँटिक-थ्रिलर अब्बास-मस्तान यांनी दिग्दर्शित केला होता आणि सुभाष घई निर्मित होता. चित्रपटाची कथा होती एका माणसाची (अक्षय कुमार) ज्यावर त्याच्या बॉसने (प्रियांका चोप्रा) लैंगिक छळाचा आरोप केला होता. त्या व्यक्तीची केस त्याची वकील पत्नी (करीना कपूर) लढते आणि निर्णय त्याच्या (अक्षय कुमारच्या) बाजूने येतो.

आणखी वाचा – Satvya Mulichi Satavi Mulgi : पायाला लागल्याचे केदारचे खरं सत्य सर्वांसमोर येणार, नेत्रा करणार मोठा खुलासा, काय असेल नेमकं कारण?

आता ‘ऐतराज २’ चित्रपटाची कथा काय असेल आणि पुढच्या भागात कोणती पात्रं असतील, याबाबत अद्याप काहीही समोर आलेलं नाही. मात्र, अक्षय व प्रियंका यांनी २००५ पासून एकत्र काम केलेले नाही. कारण जेव्हा त्यांच्या अफेअरची चर्चा झाली आणि ट्विंकल खन्नाने सेटवर गोंधळ घातला तेव्हापासून दोघांनी बोलणे बंद केले होते.

Tags: Aitraaz SequelAitraaz Sequel Coming Soonbollywood movie
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Priyanka Chopra talk about virginity
Entertainment

“व्हर्जिनिटी एका रात्रीत संपते पण…”, प्रियांका चोप्राने केलेलं धक्कादायक विधान, स्त्रियांच्या सेक्स लाइफबाबत म्हणालेली…

जून 3, 2025 | 6:45 pm
Vaishnavi Hagawane Death
Social

वैष्णवीच्या मृत्यूबाबत संशय, साडी व पंखा ७१ किलो वजन पेलू शकेल का?, फॉरेन्सिक रिपोर्ट ठरणार महत्त्वाचे

जून 3, 2025 | 6:00 pm
Zepto News
Social

अन्न तुंबलेल्या पाण्याजवळ ठेवले आणि…; झेप्टोचा किळसवाणा प्रकार समोर, तुम्हीही ऑर्डर करत असाल तर…

जून 3, 2025 | 4:23 pm
Actor Vibhu Raghav death
Entertainment

Video : कॅन्सरमुळे सुप्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, लेकाला शेवटचं पाहताना ढसाढसा रडली आई, भावुक व्हिडीओ समोर

जून 3, 2025 | 3:50 pm
Next Post
malaika arora on fathers

"आता आईची काळजी घ्यायची आहे आणि…", वडिलांच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच बोलली मलायका अरोरा, म्हणाली, "वडिलांसाठी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.