मालिकेच्या सुरवातीपासून सातत्याने टीआरपीच्या शर्यतीत अव्व्ल ठरणारी मालिका म्हणजे ठरलं तर मग.मालिकेच्या सुरवातीपासून मालिकेला भरभरून प्रेम मिळत आहे, सुरवातीपासूनच मालिकेत अनेक रंजक वळण पाहायला मिळत आहेत.सायली आणि अर्जुनच्या जोडीला देखील प्रेक्षकांचं विशेष प्रेम मिळत आहे. जुईची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते.सायली या भूमिकेला देखील प्रेक्षकांनी कमी वेळात आपलस केलं आहे .(tharla tar mag)
अर्जुन आणि सायलीच्या अचानक झालेल्या लग्नामुळे सुभेदारांच्या घरात मोठं वादळ आलं आहे. घरातल्या सगळ्यांचा या लग्नाला विरोध आहे. सायली सतत जाणवत आहे की तीच या घराशी काही तरी नातं आहे, तर पुर्णा आजीला सायलीला या घरातून बाहेर काढायचं आहे.
सायली आणि पूर्णा आज्जी एकत्र येणार(tharla tar mag)
मालिकेत सध्या पुर्णा आजीच्या वाढदिवसाची तयारी सुरु आहे, यातच मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे.सायली पुर्णा आजीच्या वाढदिवसानिमीत्त सायली त्यांच्यासाठी गुलाबजामून बनवते.आणि पुर्णा आजींना खाण्यासाठी विनंती करते तेव्हा पुर्णा आजींना प्रतिमाची आठवण येते, कारण त्यांच्या वाढदिवसाला प्रतिमा कायम गुलाबजामून बनवायची.आणि प्रतिमाच्या आठवणीत पुर्णा आजी भावुक होतात.
हे देखील वाचा – “संजयच्या त्या कमेंटमुळे मी ऑस्कर जिंकले”

पुर्णा आजी सायलीचा हळू हळू स्वीकार करणार का हे बघणं रंजक ठरणार आहे.सायली अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच सत्य सुभेदारांसोमर आलं तर काय घडणार याची देखील प्रेक्षकांना तितकीच उत्सुकता आहे. मालिकेसोबत कलाकारांची पडद्यामागची धमाल ही प्रेक्षकांच्या कायम पसंतीस पडते.(tharla tar mag)