गुरूवार, जून 5, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“त्या गाण्यात मला खूपदा उचलण्यात आलं आणि…”, अल्लू अर्जुनसह डान्स करताना रश्मिका मंदानाला वेगळाच अनुभव, घाबरली कारण…

Shamal Sawantby Shamal Sawant
डिसेंबर 23, 2024 | 4:33 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
rashmika mandana on peelings song

'पुष्पा २' चित्रपटातील 'पीलिंग्स' गाण्यावर रश्मिका मंदनाचं भाष्य

सध्या दाक्षिणात्य चित्रपट ‘पुष्पा २’ची चांगलीच चर्चा सुरु आहे. चित्रपट प्रदर्शनापूर्वीच खूप चर्चेत राहिला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. ‘पुष्पा’च्या पहिल्या भागानंतर चाहते दुसऱ्या भागांची आतुरतेने वाट बघत होते. दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर दूसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटाची कथा, संवाद पात्र व गाणी यांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे. खूप कमी दिवसांत कोट्यावधी रुपयांची कमाई केली आहे. ‘पुष्पा’च्या पहिल्या भागातील गाण्यांना मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली होती. ‘सामी’, समंथा रुथ प्रभूवर चित्रित केलेलं ‘ऊ अंतवा’ ही गाणी विशेषतः चर्चेत राहिली. मात्र दुसऱ्या भागातील गाणी खास कमाल करु शकली नाहीत. (rashmika mandana on peelings song)

अल्लू अर्जुनच्या या चित्रपटामध्ये रश्मिका मंदना ही मुख्य भूमिका साकारताना दिसली. श्रीवल्ली असे तिच्या भूमिकेचे नाव आहे. अल्लू अर्जुन व रश्मिका यांच्यावर पिलिंग हे गाणं चित्रित करण्यात आलं होतं. जबरदस्त डान्स स्टेप, एनर्जेटिक गाण्याला मात्र प्रेक्षकांची म्हणावी तितकी पसंती मिळाली नाही. या गाण्यामधील डान्स स्टेप प्रेक्षकांना पसंत पडल्या नाहीत. अशातच आता या गाण्याबद्दल खुद्द रश्मिकाने भाष्य केले आहे.

आणखी वाचा – Video : घरावर हल्ला झाल्यानंतर अल्लू अर्जुनने घाबरुन बायको-मुलांसह सोडलं राहतं घर, अभिनेत्याची वाईट परिस्थिती, तर सहा आरोपींना अटक

View this post on Instagram

A post shared by Rashmika Mandanna (@rashmika_mandanna)

रश्मिकाने नुकतीच ‘Galatta plus’ बरोबर संवाद साधला. यावेळी ती ‘पीलिंग्स’ या गाण्याबद्दल म्हणाली की, “हे गाणं प्रदर्शनाच्या काही दिवसांपूर्वी चित्रित झाले होते. पाच दिवसांत हे गाणं चित्रित झाले होते. चित्रीकरणाच्या वेळी मी अल्लू अर्जुन सरांच्या डोक्यावर डान्स करत आहे असं वाटलं. मला लिफ्टिंगची भीती वाटते. लोक मला लिफ्ट करत होते त्यामुळे मला खूप अवघडल्यासारखं वाटत होतं. या गाण्यामध्ये मला खूप उचलून घेण्यात आलं होतं”.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध गायिका परंपराने दिला गोंडस मुलीला जन्म, नवऱ्याने शेअर केला व्हिडीओ, दाखवली बाळाची पहिली झलक

पुढे ती म्हणाली की, “एक अभिनेत्री म्हणून लोकांचे मनोरंजन करणे माझं काम आहे. दिग्दर्शकाची पोचपावती मिळावी म्हणून मी काम करते. माझ्या पोटापाण्याचे साधन आहे. जर मी माझ्या भूमिकांपासून लांब गेले आणि सतत विचार करु लागले तर मी टाइपकास्ट होईन आणि मला हे नको आहे”. दरम्यान या चित्रपटातील रश्मिकाच्या भूमिकेला चाहत्यांची खूप पसंती मिळाली आहे.     

Tags: allu arjundance steppeeling songrashmika mandana
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Anushka Sharma On RCB Victory Parade Turns Stampede
Entertainment

बंगळुरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू अन्…; विराट कोहली पाठोपाठ अनुष्का शर्माची प्रतिक्रिया, म्हणाली…

जून 5, 2025 | 12:01 pm
Vivek oberoi on bengaluru stampede
Entertainment

बंगळुरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्यूचं तांडव, विवेक ओबरॉयची पोस्ट, म्हणाला, “जवळच्या माणसांना गमावणं…”

जून 5, 2025 | 11:28 am
 Hina Khan Trolled After Marriage
Entertainment

“तुझ्या नवऱ्याने इस्लाम धर्म स्वीकारला का?”, आंतरजातीय लग्न करताच हिना खान ट्रोल, नेटकरी म्हणाले, “तुझ्या आईने…”

जून 5, 2025 | 11:20 am
Hina Khan Wedding
Entertainment

११ वर्ष डेट, वडिलांचा मृत्यू आणि कॅन्सरशी लढा; प्रत्येक अडथळ्यांमध्ये हिना खानला मिळाली पतीची साथ, अखेर अडकले लग्नबंधनात

जून 5, 2025 | 11:00 am
Next Post
Actress Aishwarya Narkar shared video from Kokan after Satvya Mulichi Satavi Mulgi serial over

Video : कोकणातल्या गावी रमल्या ऐश्वर्या नारकर, चुलीवर काम करण्याचा अभिनेत्रीचा आनंद, साधेपणाचं कौतुक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.