शुक्रवार, मे 9, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“त्यापेक्षा दारू, तंबाखू चांगला”, नागा चैतन्यचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “तुमच्या शरीरासाठी…”

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 8, 2025 | 7:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Naga Chaitanya called sugar more harmful than alcohol and tobacco.

“दारु व तंबाखू पेक्षा साखर हानिकारक”, दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्यचं वक्तव्य

दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य सध्या त्याच्या ‘थांडेल’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘थांडेल’ हा चित्रपट नागा चैतन्यच्या कारकिर्दीतील एक मोठा चित्रपट ठरु शकतो आणि तो या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. अभिनेता त्याच्या अभिनयासाठी जितका लोकप्रिय आहे. तितकाच तो त्याच्या फिटनेससाठीही ओळखला जातो. अशातच त्याने नुकताच स्वत:चा फिटनेस फंडा शेअर केला आहे. अभिनेत्याने स्वत:च्या फिटनेसबद्दल बोलताना साखरेविषयी भाष्य केलं आहे आणि त्याने साखरेला दारु व तंबाखू पेक्षा हानिकारक म्हटलं आहे. अभिनेता त्याच्या ‘थांडेल’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान व्यस्त असून या प्रमोशनदरम्यान त्याने हे भाष्य केलं आहे.  (Naga Chaitanya called sugar is harmful)

‘रॉ टॉक्स विथ व्हीके पॉडकास्ट’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये नागा चैतन्य म्हणाला की, “साखर हे तुमच्या शरीरासाठी सर्वात मोठे विष आहे. दारू चांगली, तंबाखू चांगली, काहीही चांगले. पण साखर नाही. माझा असा विश्वास आहे की, साखरेमुळे आपल्याला कर्करोग, मधुमेह आणि इतर अनेक समस्या उद्भवतात ज्या जीवघेण्या आहेत. तर, मी खूप जागरूक आहे. मी खूप कमी साखर खातो”.

View this post on Instagram

A post shared by Chay Akkineni (@chayakkineni)

आणखी वाचा – उदित नारायण यांच्या किसिंग व्हिडीओनंतर लेक आदित्य नारायणने लपवलं तोंड, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “असं काम केल्यावर…”

या वक्तव्यानंतर नागा चैतन्यने म्हटलं की, “कृपया आता माझं हे वाक्य लगेचच व्हायरल करू नका. म्हणजे यावर आता लगेच रील करू नका. मला वाटतं की, साखर खाल्ल्यानं मधुमेह, कॅन्सरसारखे आजार होतात. असे अनेक पदार्थ असतात जे आपल्यासाठी, शरिरासाठी घातक असतात. म्हणून मी फार साखर खात नाही. कधी तरी चीट डे असेल तरच मी गोड खातो”.

आणखी वाचा – Video : …अन् अमिताभ बच्चन यांनी त्या मुलीच्या शूजची बांधली लेस, प्रेक्षकांककडून भरभरुन कौतुक, म्हणाले, “इतका साधेपणा…”

या मुलाखतीत त्याने स्वत:च्या वैवाहिक नात्याबद्दलही भाष्य केलं. अभिनेत्याने सांगितले की आम्हाला आमच्या पद्धतीने पुढे जायचे होते आणि आमच्या स्वतःच्या कारणांसाठी दोघांनी मिळून हा निर्णय घेतला. आम्ही दोघेही आमच्या आयुष्यात पुढे जात आहोत. आम्ही गोपनीयतेची मागणी केली होती. प्रेक्षक आणि माध्यमे त्याचा आदर करतील अशी मला आशा होती, पण तसे झाले नाही”.  

Tags: Naga Chaitanya called sugar is harmfulNaga Chaitanya called sugar more harmful than alcohol and tobaccoSouth actor Naga Chaitanya
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

virat kohli and rahul vaidya fight
Entertainment

विराट कोहलीला डिवचनं राहुल वैद्यला पडलं महागात, क्रिकेटरच्या भावाने सुनावलं, म्हणाला, “मूर्ख, फॉलोवर्स वाढवण्यासाठी…”

मे 9, 2025 | 12:30 pm
soldier duty over marriage
Social

हळद फिटली नसतानाही जवान लग्नाच्या तिसऱ्या दिवशी कामावर रुजू, आई-वडील भावुक तर पत्नीचा खंबीर पाठिंबा, मन हेलावणारा व्हिडीओ

मे 9, 2025 | 11:22 am
Akshay Kelkar Haldi Ceremony
Entertainment

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला लागली हळद, घरीच कुटुंबियांसह सेलिब्रेशन, मराठी कलाकारांची हजेरी

मे 9, 2025 | 10:56 am
Which Cooking Oil Is Good
Lifestyle

‘या’ तेलामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिकाधिक वाढतंय, जेवणात कोणतं तेल वापरणं अधिक उत्तम?, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार…

मे 8, 2025 | 7:00 pm
Next Post
09 February Horoscope

09 February Horoscope : मेष व कन्या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ, रविवारचा दिवस आनंदाचा, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.