Sonu Nigam Concert Video : सोनू निगमच्या गायनाचे लाखो दिवाने चाहते आहेत. सोनू निगम त्याच्या गायनाचे अनेक कॉन्सर्ट वेळोवेळी घेताना दिसतो. अशातच सोनू निगमच्या एका कॉन्सर्टदरम्यान पुन्हा एक धक्कादायक घटना घडली असल्याचं समोर आलं आहे. सोनू त्याच्या परफॉर्मन्समध्ये व्यस्त होता आणि त्याच दरम्यान एक व्यक्ती स्टेजवर पोहोचला. यावेळी स्टेजवर पोहोचलेल्या त्या व्यक्तीचा हेतू काय होता हे मात्र कळू शकले नाही, पण यानंतर स्टेजवर जे घडले ते पाहून उपस्थित सगळेच आश्चर्यचकित झाले. सोनू निगमला परफॉर्मन्सदरम्यान अशा प्रकारचा सामना करण्याची ही पहिलीच वेळ नाही.
सोनू निगम स्टेजवर गाताना समोरुन येणा-या या व्यक्तीचा त्याला भास झाला होता. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला आहे. सोनू गाणे म्हणत असताना तो स्टेजवरील व्यक्तीपासून दूर पळताना दिसला, तर ती व्यक्ती सतत त्याच्याकडे जाताना दिसली. तो आणखी काही करण्याआधीच स्टेजच्या आजूबाजूला उभे असलेले सुरक्षारक्षक आणि बाउन्सर त्याच्या दिशेने धावले.
त्यांनी आधी त्याला स्टेजवर धक्काबुक्की केली आणि नंतर बेदम मारहाण करुन स्टेजच्या बाहेर ढकलले. मजेशीर गोष्ट म्हणजे हे सर्व स्टेजवर घडले, पण सोनूने त्याचं गाणं गायचं काही थांबवलं नाही. आता सोशल मीडियावर या व्हिडीओवर लोकांच्या अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत. एकाने म्हटले आहे, “सोनू निगम सर इतके सक्रिय आणि त्यांच्या टोनमध्ये इतके मजबूत आहेत, ते इतके धारदार कट मारुन पळून गेले”. आणखी एक म्हणाला, “एवढे सगळे असूनही सोनू निगम इतका चांगला अभिनय करत राहिला हे आश्चर्यकारक आहे”.
मात्र, त्या व्यक्तीवर प्राणघातक हल्ला झाला हे काही लोकांना आवडले नाही. एकजण म्हणाला, “काहीही झाले तरी त्याला मारायला नको होते. तर एक म्हणाला, “तो सोनूजीबरोबर कबड्डी खेळायला आला होता ना?”.