Javed Akhtar Slams Users : बॉलिवूडचे ज्येष्ठ गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांना चांगलेच फटकारले आहे. रविवारी रात्री पाकिस्तानविरुद्ध भारताच्या विजयानंतर विराट कोहलीसाठी ट्विट केल्यावर जावेद साहेबांचा राग अनावर झाला कारण काही नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. चॅम्पियन ट्रॉफीच्या भारत-पाकिस्तान सामन्यात भारताने पाकिस्तानला हरवत दणदणीत विजय मिळवला. भारत-पाकिस्तानचा हा सामना चांगलाच रंगला. या सामन्यातील विराट कोहलीच्या कामगिरीने अनेकांची मनं जिंकली. या सामन्यात विराटने पूर्ण केलेलं शतक हे ५१ वं होतं. विराटच्या या कामगिरीचं कौतुक करण्याचा मोह गीतकार जावेद अख्तर यांनाही आवरला नाही.
जावेद अख्तर यांनी कौतुक केल्यानंतर त्यांना नेटकऱ्यांनी ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना हे ट्रोलिंग सहन झाले नाही आणि त्यांनी थेट प्रतिउत्तर देत नेटकऱ्यांना फटकारलं. “तुम्ही एक नीच व्यक्ती आहात आणि तुम्ही नीच म्हणूनच मरणार आहात”. विराट कोहलीने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये पाकिस्तानविरुद्ध एक चमकदार शतक खेळला. संघाने हा सामना जिंकला. प्रत्येक भारतीयांप्रमाणेच जावेद अख्तर यांनाही आनंदाचा पारावर उरला नाही. त्यांनी लगेचच ट्विटरवर (एक्स) शेअर केले की, “विराट कोहली, झिंदाबाद !!! आम्हाला सर्वांचा अभिमान आहे !!!”.
Virat Kohli , zindabad. !!! . We all are so so so proud of you !!!
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) February 23, 2025
अर्थात, जावेद अख्तरने जे लिहिले ते म्हणजे, “प्रत्येक भारतीयांच्या हृदयाचा आवाज. परंतु अशा निकृष्ट मनाच्या लोकांबद्दल काय बोलायचे, त्यांच्या रक्तात रक्त नाही तर उन्मत्तपणा वाहत असतो”. एका असभ्य नेटकऱ्याने जावेद अख्तर यांच्या ‘जावेद’ या नावावरुन डिवचले. “जावेद बाबरचे वडील कोहली आहेत. जय श्री राम!”, असं त्याने म्हटलं.
आणखी वाचा – महाकुंभ मेळ्याला पोहोचला अक्षय कुमार, गंगेत स्नान करताना भावुक, अभिनेत्याला पाहायला चाहत्यांची तुफान गर्दी
जावेद साहेबने त्याच प्रकारे दुसर्या नेटकऱ्यालाही सुनावले. “आज सूर्य कुठे उगवला आहे. आतून तर तुम्ही दु: खी झाला असाल. त्यावेळी नेमकं काय होते”. यावर जावेद साहेबांनी प्रतिसाद दिला आणि लिहिले, “मुला, जेव्हा तुझे वडील ब्रिटीशांचे शूज चाटत होते, तेव्हा माझे स्वातंत्र्य तुरूंगात आणि काळ्या पाण्यात होते. माझ्या नसा देशाच्या प्रेमींचे रक्त आहे आणि तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्रिटीश नोकरांचे रक्त आहे. हा फरक विसरु नका”.