प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येच्या बातमीनंतर आज आणखी एक दुर्दैवी बातमी समोर आली. ज्येष्ठ साहित्यिक व कवी ना. धों. महानोर यांचे आज वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने अवघे कलाविश्व गहिवरलं आहे. दोघांनी आपापल्या क्षेत्रात मोठे योगदान दिले असून त्यांच्या निधनाने कलाविश्वात एक पोकळी निर्माण झाली आहे. (nitin desai and n. d. mahanor demised)
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने एक भावुक पोस्ट शेअर करत कला दिग्दर्शक नितीन देसाई व कवी ना. धों. महानोर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सोनाली या पोस्टमध्ये म्हणतेय, “कालच्या धक्क्यातून अजून सावरतां आलं नाही आणि आज ही आणखी एक दुःखद बातमी आली. नितीन देसाईंनंतर ना. धों. महानोर… असा कसा हा नियतीचा खेळ ठरावा…!”
सोनालीने जागवल्या ‘अजिंठा’ चित्रपटातील आठवणी (sonalee kulkarni on demise of nitin desai and n. d. mahanor)
२०१२ मध्ये सोनालीने ‘अजिंठा’ नावाचा चित्रपट केला होता, ज्याची निर्मिती व दिग्दर्शन नितीन देसाई यांनी केले होते. तर कवी ना. धों. महानोर यांनी या चित्रपटासाठी गाणी लिहिली होती. या चित्रपटाबद्दलच्या आठवणी जागवताना सोनाली म्हणाली, “माझ्या आयुष्यात ज्यांनी ‘अजिंठा’ आणला असे नितीन देसाई आणि या महाकाव्याचे जनक ना. धों. महानोर आज आपल्यात नाही, पण त्यांच्या कलाकृतीं अजारामर राहतील. आपल्याला आयुष्यभर उर्जा देत राहतील हे नक्की”
नितीन देसाईंबद्दल व्यक्त होताना सोनाली म्हणाली, “नितीन देसाई यांचं असं जाणं जिवाला चटका लावून जाणारं आहे. त्यांचं कामाबद्दल, कलेबद्दलचं प्रेम, वेड, हे खूप काही शिकवून गेलं. त्यांचं कला विश्वातलं कार्य हे अभिमानास्पद आहेच आणि ते पुढील अनेक वर्ष कलाकारांना प्रेरणादायी ठरेलच”. (sonalee kulkarni on demise of nitin desai and n. d. mahanor)
तर याच चित्रपटाच्या निमित्ताने सोनाली कुलकर्णीला कवी ना. धों. महानोर यांना भेटण्याचा योग आला होता. त्याबद्दल बोलताना सोनाली म्हणते, ” पद्मश्री ना. धों. महानोर यांना ‘अजिंठा’च्या निमित्ताने भेटण्याचा योग आला होता. त्यांचं ‘अजिंठा’ नामक स्वप्न पडद्यावर साकारण्याचं भाग्य मला लाभलं. रानकविता आज खऱ्या अर्थाने ओसाड झाल्या.. घन ओथंबून येती.. हे शब्दांत व्यक्त करणारे ना. धों. महानोर आज इहलोकीच्या प्रवासाला निघून गेले. रानापासून मनापर्यंत पोहचलेला हा कवी माणूस. ‘जैत रे जैत’ ते ‘अजिंठा’ ची गाणी ऐकताना महानोर सर तुमची आठवण येत राहील.. भावपूर्ण श्रद्धांजली” सोनालीने या पोस्टबरोबर शेअर केलेला फोटो विशेष लक्ष वेधून घेत आहे. (sonalee kulkarni on demise of nitin desai and n. d. mahanor)
हे देखील वाचा : ज्येष्ठ साहित्यिक व कवी ना. धों. महानोर काळाच्या पडद्याआड, वयाच्या ८१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास