शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मुस्लिम मुलाबरोबर लग्न करण्यावरुन सोनाक्षी सिन्हावर वडील व भाऊ नाराज?, शत्रुघ्न सिन्हांच्या एका वक्तव्यामुळे सगळीकडे खळबळ

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 12, 2024 | 1:37 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Sonakshi Sinha Wedding

मुस्लिम मुलाबरोबर लग्न करण्यावरुन सोनाक्षी सिन्हावर वडील व भाऊ नाराज?, शत्रुघ्न सिन्हांच्या एका वक्तव्यामुळे सगळीकडे खळबळ

सोनाक्षी सिन्हाच्या प्रियकर झहीर इक्बालबरोबर लग्न होणार असल्याच्या बातम्या सध्या चर्चेत आल्या आहेत. पण असे देखील बोलले जात आहे की, अभिनेत्रीने मुस्लिम मुलाशी लग्न करत असल्याने तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा व भाऊ लव सिन्हा खूश नाहीत. सोनाक्षी सिन्हा या महिन्यात तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बालसह लग्न करणार आहे. ‘हीरामंडी’ फेम या कलाकारांच्या लग्नात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित राहू शकतात, असे सांगितले जात आहे. अभिनेत्रीने तिच्या हीरामंडीच्या सहकलाकारांना लग्नाचे आमंत्रणही पाठवले आहे. सध्या सर्वत्र सोनाक्षी व झहीरच्या लग्नाची चर्चा होत आहे. या सगळ्यादरम्यान सोनाक्षीच्या घरच्यांकडूनही तिच्या लग्नाबाबत प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. (Sonakshi Sinha Wedding)

सोनाक्षीच्या लग्नाबाबत तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितले आहे की, त्यांना त्यांच्या मुलीच्या लग्नाची कोणतीही बातमी कळालेली नाही. ‘झूम’बरोबरच्या खास संवादात शत्रुघ्न सिन्हा म्हणाले आहेत की, “मी दिल्लीत आहे. निवडणुकीच्या निकालानंतर मी येथे आहे. मी अजून माझ्या मुलीच्या योजनांबद्दल बोललो नाही. तुमचा काय प्रश्न आहे की ती लग्न करत आहे?, तर तिने मला अजून काही सांगितले नाही, असे उत्तर त्यांनी दिले आहे. जेव्हा ती माझ्याशी याबद्दल बोलेल तेव्हा माझे आशीर्वाद तिच्या पाठीशी असतील. तिला जगातील सर्व सुख मिळावे अशी आमची इच्छा आहे”.

आणखी वाचा – “कुळकर्णी व मासे कसे खाता?”, पापलेट, कोळंबी, खेकडे खाण्यावरुन नीना कुळकर्णींना नेटकऱ्यांनी सुनावलं, यामध्ये अभिनेत्रीचं चुकलं काय?

शुत्रघ्न सिन्हा पुढे म्हणाले की, “लोक मला लग्नाबद्दल प्रश्न विचारत आहेत. तुम्हाला याबद्दल काहीच माहिती नाही आणि मीडियाला सर्व काही माहित आहे”. यावर मी एवढेच सांगू इच्छितो की, “आजकालची मुलं त्यांच्या पालकांना विचारत नाहीत. ते फक्त येऊन सांगतात. आणि आम्ही सांगितले जाण्याची वाट पाहत आहोत”. वडील शत्रुघ्न सिन्हा पाठोपाठ सोनाक्षीचा भाऊ लव सिन्हा यालाही बहिणीच्या लग्नाबद्दल माहिती नाही. सोनाक्षीच्या लग्नाबाबत लव पुढे म्हणाला की, “या प्रकरणात माझा कोणताही सहभाग नाही”.

आणखी वाचा – “सकाळी सकाळी पोलिसांनी पकडलं आणि…”, संकर्षण कऱ्हाडेने शेअर केलेली पोस्ट चर्चेत, म्हणाला, “मला त्यांच्याबरोबर…”

भाऊ आणि वडिलांच्या या वक्तव्यानंतर लोकांना वाटते की, सोनाक्षीचे कुटुंब मुस्लिम मुलाशी लग्न करण्याच्या निर्णयावर खूश नाही आहेत. लोकांना वाटत आहे की, सोनाक्षीने तिच्या घरच्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न करण्याचा विचार केला आहे. कारण आतापर्यंत सोनाक्षीच्या कुटुंबीयांकडून असे कोणतेही विधान आलेले नाही, ज्यावरुन तिचे कुटुंब तिच्या लग्नावर आनंदी असल्याचे दिसत आहे. या सगळ्यादरम्यान सोनाक्षी व झहीर लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याच्या बातम्या येत होत्या. गेल्या वर्षी, अभिनेत्रीने एक नवीन अपार्टमेंटदेखील खरेदी केले होते. त्यानंतर तिच्या एकत्र राहण्याच्या बातम्या खऱ्या मानल्या गेल्या होत्या. सोनाक्षी व झहीरची पहिली भेट सलमान खानने आयोजित केलेल्या पार्टीत झाली होती.

Tags: bollywood actresssonakshi SinhaSonakshi Sinha and zahir iqbal weddingSonakshi Sinha Wedding
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Marathi actress Pallavi Subhash's mother passed away and she shared a post on social media

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री पल्लवी सुभाषच्या आईचे निधन, कुटुंबीय हळहळले, व्यक्त केलं दुख

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.