एखाद्या कलाकाराच्या आयुष्यात मिळवलेल्या पैशा पेक्षाही मिळवलेला सन्मान महत्वाचा असतो. अगदी शाळेत एखाद्या स्पर्धेत मिळालेलं उत्तेजनार्थ प्रशीस्तिपत्र असो किंवा एखाद्या कलाकृतीसाठी साठी मिळालेलं मानांकन ते अगदी आयुष्भर जपून ठेवावं हे सगळ्यांचं स्वप्न असत. पण कधी कधी परिस्थतीला कदाचित ते मेनी नसावं. आयुष्याच्या संघर्षात आवडत्या गोष्टींचा अनिश्चित त्याग करावा लागतो.अभिनेत्री स्नेहल शिदम सोबत सुद्धा असच काहीसं घडलं होतं परिस्थती समोर तिला तिच्या आवडत्या गोष्टींचा त्याग करावा लागला होत. या बद्दलचा अनुभव तिने इट्स मज्जाला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे.(snehal shidam trophies)
स्नेहल शिदमला मुलाखतीत जेव्हा तिला तिच्या घरातील आवडत्या जागे बद्दल, गोष्टीबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने सांगितले कि जेव्हा केव्हा मी इथून नव्या घरात जाईन तेव्हा सोबत उरलेल्या किंवा मिळवलेल्या, मिळणाऱ्या सगळ्या ट्रॉफीज मी न विसरतां घेऊन जाईन असं तिने सांगितल. या आधी एकदा घडलेल्या प्रसंगा बद्दल तिने सांगितलं होत. जेव्हा ते एक घर सोडून दुसऱ्या घरी जात होते तेव्हा जागा नसल्या कारणाने तिला तिच्या काही ट्रॉफीज विकाव्या लागल्या होत्या.

तेव्हा तिने ठरवलं कि इथून पुढे असं काही झालं तरीही तिला या ट्रॉफीज विकाव्या लागू नयेत. त्या साठी स्नेहलच्या वडिलांनी गावच्या घरात एक वेगळी जागा स्नेहलच्या ट्रॉफीजसाठी ठेवली आहे. तेव्हा पासून स्नेहाला मिळालेल्या सगळ्या ट्रॉफीज, बक्षीस ते इथून गावी घेऊन जातात आणि स्नेहलच्या रूम मध्ये ठेवतात. जेव्हा केव्हा मी गावी जाईन तेव्हा ते पाहून मला आनंद वाटावा म्हणून माझ्या बाबांनी हे सगळं केलं असं स्नेहल ने मुलाखती दरम्यान सांगितलं.
असा होता स्नेहल शिदमचा प्रवास(snehal shidam trophies)
स्नेहल शिदम ही “चला हवा येउद्या” होऊ दे वायरल या पर्वाची विजेती ठरली होती. स्नेहल ही “चला हवा येउद्या” या विनोदी रियालिटी कार्यक्रमातून नावारूपाला आली कारण विजेते पद जिंकल्यानंतर स्नेहल शिदम हिने याच कार्यक्रमात पुढे काम केले. तिने तिच्या विनोदी अभिनयाने अखंड महाराष्ट्राला खळखळून हसवलं.
====
हे देखील वाचा- ‘मी आणि निखिल खूप….’ निखिल आणि स्नेहलच्या अफेरच्या चर्चांवर अखेर स्नेहल शिदमचं स्पष्टीकरण
====
स्नेहल आता टॉप ची विनोदी अभिनेत्री आहे पण ज्यावेळी ती स्ट्रगल करत होती त्यावेळेस तिला ऑडिशनला गेल्यावर तिच्या रंगावरून आणि जाडपणामुळे रिजेक्ट केलं जायचं पण जेव्हा तिने “चला हवा येउद्या” होउदे वायरल या पर्वा चं ऑडिशन दिलं तेव्हा ती त्यात सिलेक्ट झाली शिवाय तिने तिच्या विनोदी अभिनयाने हा कार्यक्रम जिंकला सुद्धा.