मंगळवार, जून 3, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“हे रसायन वेगळंच आहे”, ‘बिग बॉस’च्या घरातील सुरज चव्हाणच्या एण्ट्रीवर उत्कर्ष शिंदेची पोस्ट, म्हणाला, “छान किंवा वाईट…”

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 29, 2024 | 10:56 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Singer Utkarsh Shinde posted on social media about Reelstar Suraj Chavan's entry in 'Bigg Boss' house.

"हे रसायन वेगळंच आहे", 'बिग बॉस'च्या घरातील सुरज चव्हाणच्या एण्ट्रीवर उत्कर्ष शिंदेची पोस्ट, म्हणाला, "छान किंवा वाईट..."

Bigg Boss Marathi Season 5 Update : ‘बिग बॉस’ मराठीच्या नवीन पर्वाचे बिगुल वाजले असून धमाकेदार ग्रँड प्रीमियर सोहळ्याने यंदाच्या नवीन पर्वाची सुरुवात झाली आहे. यंदाच्या सीझनमध्ये दमदार स्पर्धकांचा सहभाग आहे. यंदाच्या सीझनचं होस्टिंग रितेश देशमुख करत आहे. रितेश देशमुखने बिग बॉसच्या पाचव्या सीझनच्या पहिल्याच एपिसोडमध्ये आपली छाप सोडली. विजेता ठरण्यासाठी, टास्क जिंकण्यासाठी शह-कटशह, ठस्सनही जोरात असणार आहे. याची झलक ग्रँड प्रीमियरच्या एपिसोडमध्ये दिसून आली. गेल्या काही दिवसांपासून यावर्षी स्पर्धक म्हणून घरात कोण प्रवेश करणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती आणि ही उत्सुकता अखेर संपली.

वर्षा उसगांवकर, कोकण हार्टेड गर्ल, निखिल दामले, पंढरीनाथ कांबळे, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घन:श्याम दरवडे, इरिना रूडाकोवा, निकी तांबोळी, अरबाज पटेल, वैभव चव्हाण, आर्या जाधव, धनंजय पोवार, पुरुषोत्तमदादा पाटील, सूरज चव्हाण या स्पर्धकांनी ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री घेतली. या घरातील स्पर्धकांच्या एन्ट्रीबर ‘बिग बॉस’च्या माजी स्पर्धकांनी टिप्पणी केली आहे. ‘बिग बॉस’च्या गेल्या पर्वाचा स्पर्धक उत्कर्ष शिंदेने सुरज चव्हाणच्या एन्ट्रीवर वक्तव्य केलं आहे.

उत्कर्षने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. उत्कर्षने सुरजचा फोटो शेअर करत त्याच्याबद्दल असं म्हटलं आहे की, “कंटस्टंट (स्पर्धक)छान किंवा वाईट ठरवण्यात मज्जा नाही. हा (सुरज चव्हाण) असाच रॉ, फ्री, मोकळा, निर्भीड खेळला तर बऱ्याच जणांना याला सांभाळायचं कसं हे कळणार नाही. त्यामुळे सुरज बिग बॉसमध्ये मज्जा आणेल. हे रसायन वेगळं आहे”.   

आणखी वाचा – अरबाज पटेल, आर्या जाधव, पुरुषोत्तमदादा पाटील व वैभव चव्हाण ‘बिग बॉस मराठी’च्या घरात धुमाकूळ घालण्यास सज्ज, कोण कोणावर भारी पडणार?

यंदाच्या ‘बिग बॉस’ मराठीच्या सीझनमध्ये चार सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आहेत. यामध्ये अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, सूरज चव्हाण आणि घन:श्याम दराडे यांचा समावेश आहे. आता, ग्रँड प्रीमियरलाच कलाकार विरुद्ध सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर असा वाद झाल्याने बिग बॉसच्या घरात काय होणार? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. 

आणखी वाचा – ‘सातव्या मुलीची…’ मालिकेला वेगळंच वळण, नेत्राच्या बाळाला इंद्राणीपासूनच धोका? इंद्राणी बाळाला मारण्याचे प्रयत्न करणार का?

दरम्यान, नुकतीच ‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या पर्वाला धमाकेदार सुरुवात झाली असून हा नेत्रदीपक सोहळा प्रेक्षकांना कलर्स मराठी वाहिनीसह जिओ सिनेमावरही पाहता येणार आहे. रोज रात्री ९ वाजता ‘बिग बॉस मराठी’ हा शो बघता येणार आहे. २४ तास ड्रामा सुरु असणाऱ्या ‘बिग बॉस मराठी’च्या घरात यावर्षी काय घडणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.

Tags: bigg boss marathi 5entertainment newsSuraj Chavanutkarsh shinde
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

seema kapoor torchered by own mother
Entertainment

आईकडून मारहाण, टॉर्चर अन् हाल; सुप्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला वाईट काळ, जन्मदातीच वैरी ठरली तेव्हा…

जून 2, 2025 | 7:00 pm
Premachi Goshta fame Swarda Thigales car accident
Entertainment

‘प्रेमाची गोष्ट’मधील मुक्ताचा अपघात, गाडी चालवताना झोप लागली अन्…; अभिनेत्रीचं मोठं नुकसान

जून 2, 2025 | 5:58 pm
Vaishnavi Hagawane Death
Entertainment

वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं बाळ कोणाजवळच राहीना, आईविना लेकराचे रडून-रडून हाल, हृदयस्पर्शी व्हिडीओ समोर

जून 2, 2025 | 5:00 pm
Radhika Apte Motherhood
Entertainment

बाळ होण्याच्या एक दिवस आधीपर्यंत केलं काम, अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतील सत्य, म्हणाली, “इथं काम करणं…”

जून 2, 2025 | 3:30 pm
Next Post
Bigg Boss Marathi Season 5 Grand Premiere Updates in Marathi

पहिल्याच दिवशी 'बिग बॉस'च्या घरातील पाणी गायब, सदस्यांची तारांबळ, आणखी नवा ट्विस्ट आणणार

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.