Sachet And Parampara Tandon Announced Their Baby Name : बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी संगीतकार आणि गायक सचेत टंडन आणि परंपरा ठाकूर अलीकडेच पालक बनले आहेत. १२ डिसेंबर रोजी त्यांचे पहिले बाळ जन्माला आले. बाळ झाल्यानंतर त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. यानंतर आता सचेत व परंपरा यांनी आपल्या मुलाचे नाव काय ठेवले आहे याबाबत खुलासा केला आहे. त्यांनी २३ डिसेंबर रोजी सोशल मीडियावर ही चांगली बातमी शेअर केली. संगीतकार आणि गायक सचेत टंडन आणि परंपरा ठाकूर सोशल मीडियावर आणि गायनाच्या जगात खूप लोकप्रिय आहेत. मुलाच्या जन्मानंतर, दोघांनीही त्याच्या जन्माच्या आनंद सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केला.
सोशल मीडियावर त्यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये मुलाच्या हाताचे एक अतिशय गोंडस चित्र शेअर करत त्यांनी एक चांगली बातमी दिली की ते आई-वडील झाले आहेत. यानंतर आता त्यांनी आपल्या मुलाचे नाव काय ठेवले आहे हे एका पोस्टमध्ये सांगितले आहे. त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात मुलाचे सुंदर नाव आणि त्याच्या नावाचा नेमका अर्थ काय आहे हे सांगितलं आहे. त्याच वेळी, या पोस्टमध्ये आणखी एक व्हिडीओ आहे ज्यामध्ये दोघेही आपल्या मुलासह देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरात पोहोचलेले दिसत आहेत.
या पोस्टमध्ये त्यांनी कमेंटमध्ये म्हटले आहे की, “आमच्या गोंडस मुलाचे या जगात स्वागत आहे. कृपया चांगले आरोग्य, आनंद आणि दयाळू होण्यासाठी आमच्या छोट्या मनाला आशीर्वाद द्या. आम्हाला आमच्या मुलासाठी नम्रपणे आपल्या सर्वांचे आशीर्वाद हवे आहेत. आपणा सर्वांचे आणि अनंताचे आभार”. यासह, त्यांनी आपल्या मुलाचे इन्स्टाग्राम अकाउंटदेखील शेअर केले आहेत, ज्यामध्ये सध्या फक्त एकच पोस्ट आहे.
त्यांनी या पोस्टमध्ये सांगितले आहे की, “मुलाचे नाव क्रिथ टंडन ठेवण्यात आले आहे. यासह, त्याने या नावाचा अर्थ सांगितला आहे आणि असे म्हटले आहे की ते भगवान विष्णू यांचे नाव आहे, जे कृष्णा या शब्दावरुन आले आहे, याचा अर्थ ते तयार केले गेले आहे. हे नाव शोधक, मूळ, सर्जनशील आणि लोकप्रिय असल्याचे प्रतीक आहे”.