Poonam Pandey Died at 32 : बॉलिवूड अभिनेत्री, मॉडेल पूनम पांडेच्या मृत्यूच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. अभिनेत्रीने वयाच्या ३२व्या वर्षी जगाचा निरोप घेतला असून यावर कोणाचाही विश्वास बसत नाही आहे. पूनमच्या आकस्मिक मृत्यूची बातमी सर्वत्र पसरताच सर्वांनीच तिला श्रद्धांजली वाहिली आहे. अशातच असे काही सेलिब्रिटी आहेत जे या बातमीला खोटे ठरवत पूनम पांडेला काहीच झालं नसल्याचं बोलत आहेत. या यादीत गायक राहुल वैद्यचेही नाव जोडले गेले आहे.
पूनम पांडेच्या मृत्यूवर सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अभिनेत्रीच्या निधनाच्या माहितीशिवाय कोणतेही अपडेट समोर आलेली नाही. तसेच पूनमच्या कुटुंबीयांशी संपर्क साधता येत नाही आहे. पूनमचा मृत्यू कुठे व केव्हा झाला याबाबत कोणतीही माहिती नाही. तसेच तिचे अंतिम संस्कार कधी होणार याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. राहुल वैद्यने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये राहुलने असे लिहिले आहे की, “पूनम पांडेचा मृत्यू झालेला नाही असे वाटणारी मी एकमेव व्यक्ती आहे का?” असं म्हटलं आहे. या पोस्टवरुन राहुलला पूनमचे निधन झाले यावर विश्वास बसत नसल्याचे समोर आलं आहे. इतर लोकांप्रमाणे राहुल देखील ही बातमी स्वीकारण्यास सक्षम नाही आहे.

केवळ राहुलच नाही तर पूनमचा मित्र व माजी लॉकअप स्पर्धक विनीत कक्करनेही ही बातमी खोटी असल्याचा दावा केला आहे. त्याने याबाबत एक निवेदन जारी करत असं म्हटलं आहे की, “मला वाटते की ही बातमी खोटी आहे. मी पूनमला ओळखतो, ती एक व खंबीर मुलगी आहे. मी तिच्याबरोबर लॉकअप शोमध्ये दोन आठवडे घालवले आहेत. त्यामुळे मला ती मुलगी म्हणून कशी आहे हे माहित आहे” असं त्याने म्हटलं आहे.
पूनमच्या मृत्यूची बातमी अनेकांनी खोटी असल्याचं म्हटलं आहे. लॉकअप शोच्या होस्टने पूनमच्या आकस्मिक निधनाबद्दल शोक व्यक्त केला. पूनमचे इतक्या लहान वयात झालेले निधन धक्कादायक आहे, असे त्यांनी आपल्या या पोस्टमध्ये लिहिले आहे. याशिवाय पूजा भट्टनेही पोस्ट करून अभिनेत्रीला श्रद्धांजली वाहिली आहे.
पूजाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “पूनम पांडेबद्दल ऐकून खूप वाईट वाटले. मी तिला कधीच भेटले नाही, पण जेव्हा आयुष्य एखाद्या तरुणावर आदळते तेव्हा ते नेहमीच विनाशकारी असते. माझ्या प्रार्थना तिच्या कुटुंबीय व मित्रपरिवारासह कायम आहेत. याशिवाय मुन्नवर फारुकी, अली गोनी, शिवम शर्मा, मंदाना करीमी, करणवीर बोहरा यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी पूनमच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.