सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

शरीराच्या त्या भागावरुन हेमांगी कवीवर अश्लील कमेंट, अभिनेत्री भडकताच केतकी माटेगांवकरचा पाठिंबा, म्हणाली “माझं शरीर…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 8, 2023 | 1:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
singer ketaki mategaonkar supported to actress hemangi kavi trolling on social media

शरीराच्या त्या भागावरून हेमांगी कवीवर अश्लील कमेंट, अभिनेत्री भडकताच केतकी माटेगांवकरचा पाठिंबा, म्हणाली "माझं शरीर..."

सध्याच्या या डिजिटल युगात सोशल मीडियाचे स्तोम अधिकच माजले आहे. या सोशल मीडियाचे  जितक्या सकारात्मक गोष्टी आहेत. तितक्याच नकारात्मक गोष्टीही आहेत आणि यातील महत्त्वाचा प्रकार म्हणजे ट्रोलिंग. सोशल मीडियावर ट्रोलिंगसारख्या घटना अत्यंत सामान्य झाल्या आहेत. अनेकांना या ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. कलाकारांनाही या ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. या ट्रोलिंगसारख्या प्रकारांवर अनेक कलाकार दुर्लक्ष करतात तर काही कलाकार या ट्रॉलर्सना त्यांच्या अंदाजात उत्तर देतात. अशातच काही दिवसांपूर्वी अभिनेत्री व गायिका केतकी माटेगांवकरला जिम करतानाच्या व्हिडीओमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. (Ketaki Mategaonkar On Instagram)

यावेळी केतकीने तिच्या सोशल मीडियाद्वारे पोस्ट शेअर करत ट्रोलर्सना सदफेतोड उत्तर दिले होते. शरीर ही देवाने दिलेली देणगी असून त्याचा अभिमान बाळगा.  तुम्ही सुंदर, अद्वितीय आहात. तुमच्यातील एखाद्या विशिष्टतेला महत्त्व द्या, जर एखादा डॉक्टर, पोषणतज्ञ, मित्र, पालक किंवा ज्यांना तुमची मनापासून काळजी आहे, ते तुम्हाला सांगतात, त्यांचे ऐका. सोशल मीडियावर अत्यंत हीन दर्जाच्या भाषेत कमेंट करणं, एका मुलीच्या शरीरावर, तिच्या शरीराच्या काही ठराविक अवयवांवर अश्लील कमेंट करणं याला स्वातंत्र्य म्हणत नाहीत” असं म्हणत तिने एक खास पोस्ट शेअर केली होती.

आणखी वाचा – Video : प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने खरेदी केली महागडी कार, व्हिडीओ शेअर करत दिली आनंदाची बातमी, कलाकारांनीही केलं कौतुक

अशातच अभिनेत्री हेमांगी कवी हिलादेखील नुकताच या ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. हेमांगीच्या एका व्हिडीओवर नेटकऱ्याने अश्लील कमेंट केली होती. यानंतर या कमेंटला इन्स्टाग्राम स्टोरीवर मेन्शन करत हेमांगीने त्याचा चांगलाच समाचार घेतला. “ही अशी जनावर वृत्तीची माणसं समाजात हिंडताना माणसाची कातडी घालून समाजात वावरतात. पण ती जनावरचं असतात. चित्रपट किंवा नाटक हे काल्पनिक असतात. पण आपल्या आजूबाजूला अशी खरीखुरी माणसं आहेत. हे वार करतात आणि पकडलेही जात नाहीत. हे कुठल्याही चित्रपट किंवा नाटकापेक्षा घातक असून ही माझ्यासाठी एक प्रकारची हिंसाच आहे.” असं म्हणत तिने संताप व्यक्त केला होता.

आणखी वाचा – “घरात ज्यांना काडीची किंमत नसते…” , सोशल मीडियाचा वापर न करण्याबाबत उपेंद्र लिमयेंचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाले “अनेकजण खोटे…”

दरम्यान, तिच्या या पोस्टला केतकीने पाठिंबा दिला आहे. केतकीने हेमांगीच्या पोस्टचा स्क्रीनशॉट काढून स्वत:च्या इन्स्टाग्राम स्टोरीवर मेन्शन केलं आणि त्यावर “खरं आहे हेमांगी ताई” असं म्हणत “माझं शरीर, माझा अभिमान” असा हॅशटॅगही दिला आहे. त्यामुळे हेमांगीच्या या पोस्टवर केतकीने तिचे समर्थन दिलं असून सोशल मीडियावरील ट्रोलिंगबाबतही भाष्य केलं आहे.    

Tags: entertainment newshemangi kaviketaki mategaonkarmarathi actressmarathi entertainmentMarathi newsmarathi singer
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
Upendra limaye talk about why are people afraid of them

"उपेंद्र लिमयेंना लोक का घाबरतात?", प्रश्न विचारताच अभिनेत्याने सांगितलं सत्य, म्हणाले, "माझ्यापासून चार हात लांब…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.