कॉमेडीयन कपिल शर्मा आपल्या ‘द कपिल शर्मा’ या शोमध्ये अनेक सेलिब्रिटींबरोबर विनोद करण्यासाठी ओळखला जातो. अर्थातच हा विनोद एका मर्यादेपर्यंत असेल तर चांगला वाटतो. पण कधी कधी असे काही घडते जे लोकांनाही आवडत नाही. अलीकडेच ॲटली ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये बेबी जॉनच्या प्रमोशनसाठी उपस्थित होते. यादरम्यान कपिल शर्माने त्याला एक गोष्ट विचारली, जी सोशल मीडियावरील नेटकऱ्यांना अजिबात आवडली नाही आणि यामुळे कपिल शर्मा सध्या नेटकऱ्यांच्या टीकेचा धनी बनला आहे. (Chinmayi Sriprada critical post on Kapil Sharma)
येत्या २५ डिसेंबर २०२४ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या ‘बेबी जॉन’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी संपूर्ण टीम ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये सहभागी झाली होती. या शोमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात कपिल ॲटलीचा अपमान करत असल्याच्या टीका नेटकऱ्यांनी केल्या आहेत. या व्हिडीओत कपिल ॲटलीला असं म्हणतो की, “तुम्ही कधी कोणत्या मोठ्या कलाकाराला भेटायला गेलात आणि त्यांनी ओळखलं नाही असं कधी झालं आहे का?”.
Kapil Sharma subtly insults Atlee's looks?
— Surajit (@surajit_ghosh2) December 15, 2024
Atlee responds like a boss: Don't judge by appearance, judge by the heart.#Atlee #KapilSharma pic.twitter.com/oSzU0pRDS4
यावर ॲटलीली कपिलला असं म्हणतो की, “मी ए.आर. मुरुगदास (चित्रपट निर्माता) यांचे आभारी आहे, ज्यांनी त्याचा चेहरा न पाहता त्याचे काम पाहिले आणि त्याची पहिली स्क्रिप्ट तयार केली. माझी योग्य ती पात्रता ओळखली”. यानंतर त्याने “लोकांच्या दिसण्यावरुन त्यांची पात्रता ठरवू नये, तर त्यांच्या मनाने तो किती श्रीमंत आहे यावरुन ठरवले पाहिजे”. ॲटली च्या या उत्तराने सर्वांचीच मनं जिंकली.
आणखी वाचा – पेशवाई लूक, शाही थाटमाट अन्…; ‘असा’ पार पडला ‘शिवा’ फेम शाल्व किंजवडेकरचा लग्नसोहळा, Unseen Video व्हायरल
दरम्यान, गायिका चिन्मयी श्रीप्रदाने कपिलच्या ॲटलीला विचारलेल्या प्रश्नावर टीका करणारी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने म्हटलं की, “ते कॉमेडीच्या नावाखाली ॲटलीच्या त्वचेच्या रंगावर वर्णद्वेषी कमेंट करणे कधीच थांबवणार नाहीत का? कपिल शर्मासारख्या प्रभावशाली व्यक्तीकडून असे काही बोलणे निराशाजनक आहे, पण दुर्दैवाने आश्चर्यकारक नाही”.