शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सिद्धू मुसेवालाची आई  गरोदर आहे की नाही ?, वडिलांनी केलेल्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाले, “लवकरच आम्ही…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 12, 2024 | 4:09 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Siddhu moose wala father post

सिद्धू मुसेवालाची आई  गरोदर आहे की नाही ?, वडिलांनी केलेल्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाले, “लवकरच आम्ही..."

गेल्या काही दिवसांपासून पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची आई चरण कौर जुळ्या मुलांना जन्म देणार अशा चर्चांना उधाण आले आहे. पण अशातच आता सिद्धू मुसेवालाचे वडील बलकौर सिंह यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित राहिले आहेत. सिद्धूच्या निधनानंतर त्याचे आई-वडील एकटे पडले होते. त्यामुळे IVF च्या मदतीने सिद्धूची आई ५८व्या वर्षी जुळ्या मुलांना जन्म देणार आहे असे सांगितले जात आहे. (siddhu moose wala mother)

सिद्धूच्या निधनाने सर्वांनाच दु:ख झाले होते. पण त्याच्या मृत्यूच्या काही कालावधीनंतर त्याची आई गरोदर असल्याच्या चर्चा सर्वत्र सुरू झाल्या. अशातच आता सिद्धूच्या वडिलांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत लिहिले आहे की, “आमच्या कुटुंबाची चिंता करणाऱ्या सिद्धूच्या चाहत्यांचे आम्ही आभारी आहोत. पण आम्ही तुम्हाला विनंती करतो की आमच्या कुटुंबाबद्दल अनेक अफवा पसरल्या आहेत. अशा अफवांवर कृपया विश्वास ठेऊ नये. जे काही वृत्त असेल ते आम्ही स्वतः तुमच्याबरोबर शेअर करु ”. त्यांच्या या पोस्टमुळे मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. ११ मार्च रोजी चरण कौर यांना डिलिव्हरीसाठी एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आल्याचे वृत्त हाती आले होते.

आणखी वाचा-नितीश भारद्वाजच्या लेकींचं सुशांत सिंह राजपूतबरोबर होतं खास कनेक्शन, दोघींची माफीही मागितली होती, काय होतं कारण?

सिद्धूची आई चरण कौर यांनी फेब्रुवारी महिन्यापासूनच बाहेर पडणं बंद केलं होतं. त्या घरी स्वतःची काळजी घेत आहेत असेही म्हणत आहेत. त्या स्वतः मूसाल गावाच्या सरपंच राहिल्या आहेत. त्यांचे कुटुंब हे कॉँग्रेस पार्टी समर्थक आहे.

आणखी वाचा-मावशी होणार हे कळताच दीपिका पदुकोणच्या बहिणीचं मोठं भाष्य, म्हणाली, “बाळाला बिघडविण्यात…”  

२९ मे २०२२ रोजी बिष्णोई गँगने सिद्धूवर गोळीबार केला आणि त्यामध्येच त्याचा मृत्यू झाला. मृत्यूसमयी तो अवघ्या २८ वर्षाचा होता. त्याने आपल्या गाण्यांनी चाहत्यांची मने जिंकली होती.देशभरात त्याचे अनेक चाहते आहेत. त्याच्या मृत्यूनंतर मात्र सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली आहे. पण आईच्या गरोदरपणाच्या वृत्तानंतर सर्वांनाच आश्चर्याचा  धक्का बसला होता.

Tags: pregnant motherSiddhu moose walasiddhu moosewala fathersiddhu moosewala mother
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Priya bapat online shopping experience
Entertainment

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

जून 6, 2025 | 11:07 am
muzammil ibrahim  On deepika padukone
Entertainment

तिने प्रपोज केलं, दोन वर्ष रिलेशनमध्ये होतो आणि…; दीपिका पदुकोणच्या पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडचा खुलासा, कोण आहे मुजम्म‍िल इब्राहिम?

जून 6, 2025 | 11:02 am
Hina Khan Wedding
Entertainment

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कामावर परतली हिना खान, अगदी सिंपल लूकमध्ये दिसली, एकटी दिसताच नेटकरी म्हणाले, “नवरदेव कुठे आहे?”

जून 6, 2025 | 10:30 am
javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Next Post
Lagira Zhala Ji talent fame Mahesh Jadhav started his new business in phaltan see the details

‘लागिर झालं जी’ फेम अभिनेत्याचं उद्योग क्षेत्रात पदार्पण, सुरु केला स्वत:चा नवीन व्यवसाय, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.