रविवार, जून 1, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

नणंदेकडून तितीक्षा तावडेला खास सरप्राइज, गिफ्ट पाहून भारावली अभिनेत्री, खास व्हिडीओ समोर

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 31, 2025 | 11:52 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Titeeksha Tawade first wedding anniversary

नणंदेकडून तितीक्षा तावडेला खास सरप्राइज, गिफ्ट पाहून भारावली अभिनेत्री

तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडके आता इंडस्ट्रीतील टॉपचे कपल म्हणून लोकप्रिय ठरत आहेत. तितीक्षा व सिद्धार्थने वर्षभरापूर्वी लग्न करत चाहत्यांना गोड बातमी दिली. दोघांच्या लग्नाचे फोटो समोर येताच सगळ्यांनाच सुखद धक्का बसला. तितीक्षा-सिद्धार्थ अगदी सुखाने संसार करत आहेत. एकमेकांबरोबर पुरेसा वेळ एकत्र घालवताना दिसतात. इतकंच काय तर तितीक्षा-सिद्धार्थ दोघांच्या कुटुंबालाही तितकाच वेळ देताना दिसतात. तितीक्षाचे तर सासरी प्रचंड लाड होतात. बऱ्याच मुलाखतींमध्ये तसेच व्लॉगमध्येही तिने याबाबत भाष्य केलं आहे. याचाच आता आणखी एक अनुभव तितीक्षाला अनुभवायला मिळाला. तिला तिच्या नणंदेने खास सरप्राइज दिलं आहे. (Titeeksha Tawade first wedding anniversary)

तितीक्षा-सिद्धार्थच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं. त्याचनिमित्त तितीक्षाच्या नणंदेने त्यांना खास सरप्राइज दिलं. सरप्राइज पाहून तर दोघंही भारावून गेले. यामध्ये खास म्हणजे नणंदेने स्वतः गिफ्ट तयार केलं होतं. अवघ्या काही दिवसांमध्येच तिने गिफ्ट बनवून दाद व वहिनीला दिलं. त्याचबाबतचा व्हिडीओ सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला. तसेच व्हिडीओला खास कॅप्शनही दिलं. त्याचीच आता चर्चा रंगत आहे.

आणखी वाचा – “शबाना व मी रस्त्यावर झोपायचो…”, जावेद अख्तर यांनी सांगितला ‘तो’ कठीण काळ, म्हणाले, “मुस्लिमांना…”

View this post on Instagram

A post shared by House of Lippan by Manjul (@house_of_lippan)

सिद्धार्थच्या बहिणीने खास पेंटिंग तयार केलं. ते अगदी आकर्षकही दिसत आहे. तितीक्षाला पेटिंग पाहून बराच आनंद झाला. व्हिडीओमध्ये दोघींमध्ये असणारं बॉण्डिंग यावेळी दिसून आलं. नणंद व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “काही नाही शब्दांत व्यक्त करण्याच्या पलिकडे असतात. माझ्या दादा व वहिनीबरोबर अगदी असंच माझं नातं आहे. त्यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला मी गिफ्ट खरेदी केलं नाही हे मला माहित होतं. गिफ्ट मला माझ्या पद्धतीने तयार करायचं होतं”.

आणखी वाचा – “आम्ही कर्ज काढून जगतोय”, भारती सिंह व तिच्या नवऱ्याचा वाईट काळ, स्वतःच केला खुलासा, कमी पैसे मिळतात अन्…

पुढे ती म्हणाली, “त्यामुळे Lippan Art करताना मी माझा जीव त्यामध्ये ओतला. स्वतःला झोकून दिलं. फक्त चार दिवसांमध्ये मी हे पेंटिंग तयार केलं. कारण प्रयत्नांना भावनांची जोड असतेच. त्यामुळे तुम्ही जगातलं सारं काही मिळवू शकता”. नणंदेचं प्रेम पाहून तितीक्षा अगदी भारावून गेली. तितीक्षाचे व्लॉग, व्हिडीओमध्ये त्यामध्ये दिसणारी तिची सासरकडची मंडळी पाहून प्रत्येक मुलीला असंच घर मिळावं असं वाटतं.

Tags: entertainment newsmarathi actormarathi actress
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Paaru Serial Sharayu Sonawane
Entertainment

‘वाकडतोंडी’ म्हणत पारूबरोबरचा फोटो शेअर करणं अभिनेत्याला पडलं महागात, कमेंट करत म्हणाली, “स्वतःच किती…”

जून 1, 2025 | 2:00 pm
Ashok Saraf
Entertainment

पायलट भाचीचे अशोक सराफांना विशेष कौतुक, पद्मश्री पुरस्कारानंतरच्या विमानप्रवासात सांभाळली फ्लाईटची धुरा, म्हणाले, “तिने माझ्यासाठी भांडून…”

जून 1, 2025 | 10:00 am
Deepali Sayed On Vaishnavi Hagawane
Entertainment

“अरे ती गेली…”, वैष्णवीच्या अफेअरच्या चर्चांवर सुप्रसिद्ध अभिनेत्री भडकली, आई-वडिलांनाही केला सवाल, म्हणाली, “जर तुम्ही…”

मे 31, 2025 | 5:30 pm
Farah Khan Big Statement
Entertainment

“‘शीला की जवानी’ आतापर्यंतचे सर्वात स्वस्त गाणे”, स्वतःच्याच गाण्याला फराह खान ठेवतेय नाव, म्हणाली, “अश्लील…”

मे 31, 2025 | 4:01 pm
Next Post
Hrishikesh Shelar Wife Shared Special Post

आठ वर्षांचा सुखी संसार; लग्नाच्या वाढदिवसाला नवऱ्याबद्दल भरभरुन बोलली 'तुला शिकवीन…' फेम अभिनेत्याची पत्नी, म्हणाली, “ हे सुंदर आयुष्य…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.