मंगळवार, जून 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“माझ्या दोन्ही सासूबाईंचा बॉब कट अन्…”, ‘शिवा’ने खऱ्या आयुष्यातही कापले केस, नवऱ्याची काय होती प्रतिक्रिया?, म्हणाली, “सुरुवातीला बघताना…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 11, 2024 | 7:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Purva Phadke On Shiva

"माझ्या दोन्ही सासूबाईंचा बॉब कट अन्…", 'शिवा'ने खऱ्या आयुष्यातही कापले केस, नवऱ्याची काय होती प्रतिक्रिया?, म्हणाली, "सुरुवातीला बघताना…"

छोट्या पडद्यावर सध्या वेगवेगळ्या विषयांवर नव्या मालिका प्रदर्शित होताना दिसत आहेत. त्यामधील काही मालिका टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थान पटकावताना दिसत आहेत. अशातच एका आगळी वेगळी लव्हस्टोरी घेऊन ‘शिवा’ ही मालिका ‘झी मराठी’ वाहिनीवर प्रदर्शित होत आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली. या मालिकेत भिनेता शाल्व खिंजवडेकर महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. तर अभिनेत्री पुर्वा फडके ही शिवा या मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. (Purva Phadke On Shiva)

शाल्व व पुर्वा यांच्यावर प्रेक्षकही भरभरून प्रेम करताना दिसत आहेत. कलाकार मंडळी त्यांची भूमिका साकारण्यासाठी नेहमीच विशेष मेहनत घेत असतात. बरेचदा भूमिकेसाठी वजन कमी-जास्त करणे हे सुरुच असतं. पण शक्यतो भूमिकेसाठी केस कापले असे शब्द फार कमी कलाकारांच्या बाबतीत कानावर येतात. अशीच भूमिकेसाठी शिवा या मालिकेतील पुर्वा हिने विशेष मेहनत घेतली असल्याचं पाहायला मिळतंय. शिवा या भूमिकेसाठी तिने बॉब कट केला आहे. याबाबत पुर्वाने नुकत्याच दिलेल्या ‘इट्स मज्जा’ या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.

आणखी वाचा – Video : अमृता देशमुखसाठी वहिनीने बनवली खानदेशी स्टाइल भरीत-भाकरी, नणंदेचा हटके पाहुणचार, खानदेशी भाषाही बोलू लागल्या आणि…

याबाबत बोलताना पुर्वा म्हणाली, “हो. मी या भूमिकेसाठी खरंच केस कापले आहेत. आणि हा लूक मला चांगला वाटतोय. माझ्या दोन्ही सासूबाईंचा बॉब कट आहे. त्यामुळे मी जेव्हा केस कापून त्यांच्यासमोर गेले तेव्हा त्या म्हणाल्या अगं खूप छान दिसतंय. माझा नवरा अमोघ पण बोलला तू अशी राहू शकतेस, ही हेअरस्टाईल तुला छान दिसतेय. त्याने माझ्या सासूला बॉब कटमध्ये पाहिलं आहे त्यामुळे त्याला नवल असं काही वाटलं नाही. सुरुवातीला थोडं बघताना त्यालाही धक्का बसला असेल, मात्र तो मला बोलला की तुला या नव्या हेअरस्टाईलमध्ये बघायची हळूहळू सवय होईल”.

आणखी वाचा – Video : हॉटेलमध्येच बियरची बॉटल डोक्यावर ठेऊन नाचू लागल्या आजीबाई, स्वतःच शिट्टीही मारली, सगळे बघतच बसले अन्…; व्हिडीओ तुफान व्हायरल

पुढे पुर्वा म्हणाली, “मला दर सहा महिन्यांनीही लूक बदलायला फार आवडतो. हा लूक मी पहिल्यांदा केला आहे. आणि मला स्वतःला हे खूप आवडलं आहे. सेटवर मी विग लावते. पण बाहेर जाताना केस कसे नीट राहतील आणि मी नीट दिसेन याकडे माझं जास्त लक्ष असतं. मी पूर्णतः मुलासारखे केस कापले आहेत. ही भूमिका अगदी माझ्याशी मिळतीजुळती आहे. काम करायला मला खूप मज्जा येत आहे. मी १५ ते २० मिनिटात शिवा या भूमिकेसाठी तयार होते”.

Tags: entertainmentmarathi serialpurva phadkePurva Phadke On Shivashiva serial
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
actress padma khnna journy

पतीचं निधन, पदरात दोन मुलं अन्…; 'रामायण' मालिकेतील कैकयी आता जगत आहे असं आयुष्य, इंडस्ट्रीमध्येही पुन्हा दिसल्या नाहीत आणि…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.