सोमवार, जून 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

शेफालीच्या अस्थी हृदयाशी धरुन ढसाढसा रडला पराग त्यागी, बायकोचं नसणं सहन होईना, व्हिडीओ पाहून चाहतेही भावुक

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 30, 2025 | 11:17 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shefali Jariwala Passed Away

शेफालीच्या अस्थी हृदयाशी धरुन ढसाढसा रडला पराग त्यागी, बायकोचं नसणं सहन होईना, व्हिडीओ पाहून चाहतेही भावुक

Shefali Jariwala Passed Away : बॉलिवूड अभिनेत्री शेफाली जरीवाला हिच्या निधनाच्या बातमीने सिनेविश्व हादरलं. वयाच्या ४२व्या वर्षी शेफालीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आणि त्यानंतर मुंबईत अंधेरी येथे तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अभिनेत्रीच्या निधनाने तिच्या पतीवर आणि कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. काल शेफालीचा नवरा परागने तिचे अस्थी विसर्जन करण्यास पोहोचला. यादरम्यान, पराग त्याची पत्नी शेफालीची अस्थीला मिठी मारुन ढसाढसा रडताना दिसला. त्याचा हा भावुक झालेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांचे हृदय पिळवटून टाकणारा आहे.

रविवारी सकाळी शेफाली जरीवाला यांच्या अंत्यसंस्कारानंतर, अभिनेत्रीचा नवरा आणि त्याचे कुटुंबीय पती पराग त्यागी अस्थी घेऊन निघताना दिसले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये पत्नीची अस्थी हृदयाजवळ कवटाळून पराग प्रचंड रडताना दिसला. व्हिडीओमध्ये शेफालीचे वडील देखील परागसह दिसले. या दोघांनाही या स्थितीत पाहून चाहतेही भावनिक झाले आणि कमेंट सेशनमध्ये कमेंट करत त्यांना खंबीर राहण्यास सांगताना दिसले. या व्यतिरिक्त, दुसरा व्हिडीओ देखील समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये, पराग पत्नी शेफाली जरीवालाची अस्थी विसर्जन करताना दिसला. या व्हिडीओमध्ये, अभिनेत्रीचे कुटुंब देखील परागला धीर देताना दिसले आहे.

आणखी वाचा – ‘तारक मेहता…’च्या बापुजींच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीला पाहिलंत का?, लूकमध्ये अभिनेत्रींनाही देते टक्कर, त्यांची जुळी मुलंही…

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood Videos (@instantbollywoodvideos)

शुक्रवारी रात्री उशिरा शेफाली जरवाला यांचे निधन झाले. अभिनेत्रीला ह्रदयाचा झटका आला. त्यानंतर नवरा पराग तिला रुग्णालयात घेऊन गेला. पण डॉक्टरांनी तिला आधीच मृत घोषित केले. अभिनेत्रीच्या अचानक निधनामुळे तिची आई आणि वडील देखील पूर्णतः खचले आहेत. या व्यतिरिक्त, अभिनेत्रीचे मित्रही हा धक्का पचवू शकत नाही आहेत. परास छाब्रा, शहनाज गिल, महिरा शर्मा, आरती सिंग, रश्मी देसाई आणि सुनिधी चौहान यांच्यासह अनेक कलाकार अभिनेत्रीच्या अंत्यसंस्कारात उपस्थित राहिले.

आणखी वाचा – सुजलेले डोळे, चेहऱ्यावर जखमा आणि…; चिन्मयी सुमितच्या गाडीचा अपघात, खंत व्यक्त करत मराठी बांधवांना आवाहनही केलं…

शेफालीच्या निधनानंतर हिंदुस्तानी भाऊही यावेळी कॅमेऱ्यासमोर रडताना दिसला. शेफाली आणि हिंदूस्तानी भाऊ यांच्यामध्ये बहीण-भावाचं नातं होतं. शेफालीच्या निधनानंतर त्यालाही दुःख अनावर झालं. तर कित्येक कलाकार मंडळींनी सोशल मीडियाद्वारे पोस्ट शेअर करत शेफालीला श्रद्धांजली वाहिली.

Tags: emotional videoentertainmentShefali Jariwala
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Savitribai Jotirao Phule
Entertainment

‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेचा नवा डिजीटल प्रवास, ‘मराठी वारसा’ युट्युब चॅनेलवर पहिला भाग प्रसारित

जून 22, 2026 | 4:13 pm
Ghabadkund Marathi Movie
Entertainment

‘घबाडकुंड’ च्या अभूतपूर्व यशानंतर मराठी युनिव्हर्सचा दुसरा अध्याय, ५० कोटींची भव्य गुंतवणूक

जून 22, 2026 | 4:07 pm
Nikhil Chavan Wedding
Entertainment

करवलीचा नखरा! भावाच्या लग्नात शिवानी बावकरचीच हवा, पाठराखीण म्हणून संभाळतेय जबाबदारी

जून 22, 2026 | 3:09 pm
Sakav marathi web series
Entertainment

बाप-लेकाच्या नात्याला जोडणाऱ्या टिझरची चर्चा, कोकणात शूट झालेली ‘साकव’ वेबसीरिज लवकरच येणार भेटीस

जून 22, 2026 | 1:35 pm
Next Post
Hina Khan

सासरी रमली हिना खान, सासरच्या मंडळींकडून सेवा करुन घेताना दिसली अन्…; कुटुंबियांच्या साधेपणाने वेधलं लक्ष

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.