अभिनेता शशांक केतकर नेहमीच त्याच्या सोशल मीडियावरील विविध पोस्टमुळे वा फोटोजमुळे चर्चेत असतो. त्याच्या चाहत्यांसांठी कायम तो नवनवीन पोस्ट शेअर करत असतो. नुकतीच शशांकने केलेल्या पोस्टने साऱ्या प्रेक्षकवर्गाचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याच्या या नव्या पोस्टमध्ये त्याने मराठी वाहिन्यांमधील संताप व्यक्त केला आहे. आगामी होळी सणाला होणाऱ्या शुटिंगला अनुसरून होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमीला अनुसरून त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. (shashank ketkar post)
आपल्या महाराष्ट्रात सगळेच सण जोरदार साजरे केले जातात, हाच वारसा पुढे चालवत मराठी मालिकांमध्येही या सणांना अग्रगण्य स्थान आहे. दिवाळी, गुढीपाडवा या सणांनी तर मराठी संस्कृती जपली जाते आणि मालिकाविश्वात या सणांना अढळ स्थान आहे.

आता सर्व मालिकांमध्ये होळीची धमाल मस्ती पाहायला मिळणार आहे. मालिकांमध्ये होळी आणि धूलिवंदन मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. मात्र काही ठिकाणी होळीच्याच दिवशी धुळवड खेळली जात असल्याचं चित्र समोर आलं आहे. विशेषतः अनेक हिंदी मालिकांमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. (shashank ketkar post)
या हिंदी मालिकांच अनुकरण मराठी मालिका आणि मराठी वाहिन्या सर्रास करताना दिसत आहेत. या प्रकरणावर भाष्य करत अभिनेता शशांक केतकरने आवाज उठवला आहे. त्याने एक पोस्ट शेअर करत मराठी वाहिन्यांना अद्दल घडवली आहे. शशांकने नुकतंच इन्स्टाग्रामवर कालनिर्णय कॅलेंडरचा फोटो पोस्ट केला असून यात त्याने ६, ७ आणि १२ मार्च या तीन तारखांना गोल केला आहे. आणि खाली कॅप्शन देत त्याने वाहिन्यांच्या निर्मात्यांना होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमी हे सण वेगळे आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
नक्की काय म्हणाला शशांक (shashank ketkar post)
“हे तीन वेगळे सण असतात !!!!! कृपा करुन रंगपंचमीला होळी म्हणू नका. आम्ही मराठी परंपरा जपतो असं म्हणणाऱ्या सर्व वाहिन्या, लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार अशा सर्वांसाठी. आपण हिंदी च अनुकरण budget मध्ये करतो का??? नाही ना … मग चुकांमध्ये तरी कशाला”, अशी पोस्ट लिहित शशांक केतकरने वाहिन्यांना खडेबोल लागवलेत. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आहे. (shashank ketkar post)

शशांकच्या या पोस्टला त्याच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दर्शविला आहे.