बॉलिवूडचा बादशाह अशी शाहरुख खानची ओळख आहे. अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या लग्नात शाहरुख खानही चमकला आणि यावेळी अभिनेत्याने असे काही केले की त्याचे सर्व व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाले. शाहरुख खानची ती कृती म्हणजे अभिनेत्याने बॉलीवूडचे दिग्गज अमिताभ बच्चन व जया बच्चन यांच्या चरणांना स्पर्श करुन त्यांचे आशीर्वाद घेतले. शाहरुखची ही कृती चाहत्यांना खूप आवडली आणि त्या दोघांबद्दलचा त्यांचा अतीव आदर पाहून सर्वजण त्यांचे फक्त कौतुक करत आहेत. (Shahrukh Khan)
हे लग्न सिनेतारकांच्या उपस्थितीत पार पडले. शाहरुख खानने केवळ बच्चन कुटुंबाचा आदरच केला नाही तर दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत आणि त्यांच्या पत्नीशी हात जोडून संवादही साधला आणि अत्यंत प्रेमाने आपली नम्रता व आदर दाखवला. हे दृश्य उपस्थित आणि चाहत्यांच्या मनाचा ठाव घेणारे खास क्षण ठरले. या व्हिडीओवर देशभरातील व जगात दूरवर बसलेल्या शाहरुखच्या चाहत्यांचीही मनं हरपली.
या सोहळ्यातील शाहरुख खानचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यामुळे लग्नादरम्यान त्याची चर्चा आणखी वाढली. अनंतच्या लग्नाच्या मिरवणुकीत नीता व मुकेश अंबानी यांच्याबरोबर शाहरुखचे आगमन हाही एक खास क्षण ठरला. आणखी एक संस्मरणीय क्षण म्हणजे सलमान खानबरोबरचा ‘भांगडा पावले’ या प्रसिद्ध गाण्यावरचा डान्स लक्षवेधी ठरला.
पत्नी गौरी खानबरोबर शाहरुख खानने अनंत अंबानीच्या लग्नाला हजेरी लावली. ऑलिव्ह ग्रीन इंडो-वेस्टर्न आउटफिटमध्ये एव्हिएटर्स आणि स्टायलिश नेकपीसमध्ये शाहरुख खूपच छान दिसत होता. या कार्यक्रमात किम कार्दशियन, जॉन सीना, निक जोनास व प्रियांका चोप्रा यांसारख्या आंतरराष्ट्रीय स्टार्ससह अनेक दिग्गज मंडळींना आमंत्रित करण्यात आले होते. कतरिना कैफ, विकी कौशल, रणबीर कपूर, आलिया भट्ट, ऐश्वर्या राय बच्चन यांसारखे बॉलीवूडचे सर्वोत्कृष्ट कलाकारदेखील उपस्थित होते. ज्यामुळे हा एक ग्लॅमरस कार्यक्रमांपैकी एक ठरला.