रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

राखी सावंतच्या पूर्वाश्रमीच्या पतीने गुपचूप उरकलं लग्न?, दुसरी पत्नीही आहे टेलिव्हिजन क्षेत्रातील अभिनेत्री

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 7, 2024 | 11:22 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Rakhi Sawant husband second marriage

राखी सावंतच्या पूर्वाश्रमीच्या पतीने गुपचूप उरकलं लग्न?, दुसरी पत्नीही आहे टेलिव्हिजन क्षेत्रातील अभिनेत्री

गेल्या काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री राखी सावंत व तिचा नवरा आदिल खान चांगलेच चर्चेत आले होते. राखीने आदिलबरोबर लग्न करुन चाहत्यांना मोठा धक्का दिला होता. दोघेही एकत्र खूप मजेत होते. अनेकदा दोघांनी आपले प्रेमही माध्यमांसमोर व्यक्त केले होते. तसेच एकत्रित व्यवसायही सुरू केला होता. पण लग्नानंतर काही कालावधीमध्येच त्यांच्यामध्ये वादविवाद होऊ लागले. माध्यमांमध्ये दोघांनीही एकमेकांवर गंभीर आरोप केले होते. पण आता आदिल एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. (Rakhi Sawant husband second marriage )

राखीमुळे चर्चेत आलेला आदिल हा व्यावसायिक असल्याचे सांगितले जात आहे. २०२२ मध्ये राखीने आदिलबरोबर गुपचुप लग्न केले. त्यानंतर ते माध्यमांसमोर आले होते. पण काही कालावधीमध्येच दोघांमध्ये वाद होऊ लागल्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यानंतर राखीने आदिलवर गंभीर आरोप लावल्यामुळे त्याला तुरुंगातही जावे लागले होते. सध्या आदिल तुरुंगातून बाहेर आहे. अशातच त्याने दुसरे लग्न केलं असल्याच्या चर्चा सुरू  झाल्या आहेत.

आणखी वाचा – शाहरुख, सलमान व आमिर खान लग्नामध्ये जाण्यासाठी किती पैसे घेतात?, अंबानी कुटुंबियांकडून घेतले तब्बल इतके रुपये

View this post on Instagram

A post shared by Faizan Haider ???? (@portraitsbyfaizan)

आदिलने आता ‘बिग बॉस १२’ मधील स्पर्धकाशी लग्न केल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार आदिलच्या जवळच्या सूत्रांनी खुलासा केला आहे की, “आदिलने २ मार्च रोजी जयपूर येथे लग्न केले. लग्न अगदी साध्या पद्धतीने आणि गुपचुप पार पडले”. सूत्रांच्या म्हणण्यानुसार आदिलला या लग्नाबाबत गुप्तता पाळायची होती.

आणखी वाचा – डिनर डेट, रोमॅंटिक अंदाज अन्…; लग्नाला ३ महिने होताच पियुष रानडेने बायकोला दिलं सरप्राइज, फोटो व्हायरल

सूत्राला विचारण्यात आले की “आदिलची पत्नी कोण आहे?” त्यावर त्याने  आश्चर्यजनक खुलासा केला आहे. त्याने सांगितले की, “आदिलने सध्या सबा खानची बहीण सोमी खानबरोबर लग्न केले आहे. दोघांनीही याबद्दल गुप्तता पाळली आहे. आदिल काही काळापासून चर्चेत आहे. त्यामुळे त्याला ही उघड करायचे नाही आहे. तसेच सोमी खानची देखील या लग्नाबाबत गुप्तता पाळण्याची इच्छा असल्याचे त्याने सांगितले. सोमी खान ही मूळ राजस्थानची आहे. सध्या सोमी व सबा या दोघीही कामाच्या निमित्ताने मुंबईमध्ये राहतात. त्यांनी ‘न्याय:द जस्टीस’, ‘केसरिया बालम’ आणि ‘हमारा हिंदुस्थान’ या कार्यक्रमांमध्ये पाहिलं गेलं आहे. आदिल व सबाला देखील अनेक पार्टीमध्ये एकत्र पाहिले गेले होते. तिथूनच त्यांच्या प्रेमाची सुरवात झाली होती असे सांगण्यात येत आहे.       

Tags: aadil khanadil second marriagehindi actressrakhi aadil marriagerakhi sawant
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Anupam kher On Mahesh Bhatt

"मी ब्राम्हण आहे, तुला शाप देतो की…", अनुपम खेर यांनी महेश भट्ट यांच्यावर काढला होता भलताच राग, म्हणालेले, "तुझ्या आयुष्यात…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.