रणवीर सिंग, आलिया भट यांची प्रमुख भूमिका असलेला ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसतोय. कोटींच्या घरात हा सिनेमा पोहोचला असल्याचं समोरही आलं आहे. गाणी, अभिनय या सोबतच चित्रपट चर्चेत आहे तो म्हणजे अभिनेते धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या किसिंग सीनमुळे. अभिनेत्रे धर्मेंद्र व अभिनेत्री शबाना आझमी सध्या किसिंग सीन वरून चांगलेच चर्चेत आहेत. त्यांच्या या किसिंग सीनवरून त्यांना बरंच ट्रोल देखील करण्यात आलं होतं. (Rocky Aur Rani Ki Prem Kahani)
धर्मेंद्र यांच्यासोबतचा किसिंग सीन पाहून पती जावेद अख्तर काय म्हणाले याबाबत शबाना आझमी यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे. सध्या त्यांनी केलेल्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा सुरु असल्याचं समोर आलं आहे. शबाना आझमी यांनी एका वृत्तवाहिनीला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांना धर्मेंद्र यांच्यासोबतचा किसिंग सीन पाहून पती जावेद अख्तर यांची प्रतिक्रिया काय होती? असा प्रश्न विचारला होता.
पाहा पत्नीचा किस सीन पाहून जावेद अख्तर काय म्हणाले (Shabana Azmi kissing Scene)

जावेद अख्तर यांनी दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल बोलताना शबाना आझमी म्हणाल्या, “त्यांची वेगळी अशी काही प्रतिक्रिया नव्हती. पण संपूर्ण चित्रपटातील माझे उद्धटपणे वागणे त्यांना खटकले. संपूर्ण चित्रपट पाहत असताना ते टाळ्या वाजवत होते, शिट्या वाजवत होते. एक वेळ तर अशी आली की ते म्हणाले माझ्या शेजारी बसलेल्या महिलेला मी ओळखत नाही.”
‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाच्या माध्यमातून करण जोहरने मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा एण्ट्री केली आहे. रणवीर सिंग आणि आलिया भट यांच्या अभिनयानं, शिवाय चित्रपटातील गाण्यांनी सोशल मीडियावर हवाचं केली आहे. बरं या चित्रपटातील आणखी एक विशेष बाब म्हणजे, मराठमोळी अभिनेत्री क्षिती जोग हिने चित्रपटात साकारलेली भूमिका होय.