मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

हाताला जखमांचे व्रण…; अपघातानंतरही १४ तास शुटिंग करतोय ‘सावळ्याची जणू…’ फेम अभिनेता, म्हणाला, “थोडक्यात…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 10, 2026 | 3:23 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Suprit Kadam urges to use helmet

हाताला जखमांचे व्रण…; अपघातानंतरही १४ तास शुटिंग करतोय 'सावळ्याची जणू…' फेम अभिनेता, म्हणाला, "थोडक्यात…"

Suprit Kadam urges to use helmet : मुंबईतील भीषण रस्त्यांबाबत अनेक कलाकार मंडळी नेहमीच आवाज उठवतात. रस्त्यावरील खड्डे, मोठ्या प्रमाणात होणार ट्राफिक आणि रस्त्यांच्या वाईट परिस्थितीमुळे होणारे अपघात यावर आजवर अनेकदा आवाज उठविला. अशातच आता रस्त्याच्या भीषण परिस्थितीमुळे एका कलाकाराचा अपघात झाला असल्याचं समोर आलं आहे. अभिनेत्याने मार लागल्याचा फोटो शेअर करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. हा अभिनेता म्हणजे सुप्रित कदम. सुप्रित सध्या ‘सावल्याची जणू सावली’ मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहे. मात्र आता अभिनेता त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आला आहे.

सुप्रितने त्याचा अपघात झाला असल्याची पोस्ट शेअर केल्याने साऱ्यांच्या नजरा त्याच्याकडे लागून राहिल्या आहेत. सुप्रितने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये त्याच्या हाताला जखमा झाला असल्याचं दिसत आहे. ही पोस्ट शेअर करत त्याने लिहिलं आहे की, “फोटो टाकण्यामागे कारण असं आहे की बांद्रा कार्टर रोडवर ७ फेब्रुवारी २०२६ ला संध्याकाळी ७ वाजता माझा अपघात झाला. रस्त्यावरच्या लाइट्स गेलेल्या आणि एक काळ्या रंगाचा कुत्रा रोड क्रॉस करता करता माझ्या बाईक खाली आला”.

आणखी वाचा – ‘कमळी’ मालिकेत मोठा ट्विस्ट, कामिनीला महाजनांनी काढलं घराबाहेर, म्हणाली, “कामिनी आजी घराबाहेर निघा…”

View this post on Instagram

A post shared by Suprit kadam (@suprit_sk)

पुढे तो म्हणाला, “सांगायचा मुद्दा असा की एक्सीडेंट मोठा झाला पण मी थोडक्यात बचावलो. माझ्या हेल्मेटमुळे. आपण किती गाडी सेफ चालवत असलो तरी समोरच्या कुठल्याही गोष्टीमुळे असे प्रसंग कधीही येऊ शकतात. हेल्मेटमुळे आपला जीव वाचू शकतो . कृपया करुन हेल्मेट कंपल्सरी वापरा. धन्यवाद”. सुप्रितची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली असून नेटकरी कमेंट करत काळजी व्यक्त करत आहेत.

आणखी वाचा – “EMI भरायला, उदरनिर्वाह करायला अभिनय करणार नाही”, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सांगितलं कामातून ब्रेक घेण्याचं कारण, म्हणाला…

सुप्रितच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. यांत सावळ्याची जणू सावली मालिकेतील मुख्य पात्र अभिनेत्री प्राप्ती रेडकरने कमेंट करत “इतकं लागलं असूनही तू १४ तास शूट करत आहेस. तुला सलाम”, असं म्हटलं आहे. यावर सुप्रितने कमेंट करत “जेव्हा तुम्हाला तुमचं काम आवडत असतं तेव्हा ते काम सुरु राहिलं पाहिजे”, असं म्हटलं.

Tags: Accident Newsmarathi actorSuprit Kadam
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
Vishal-Akshaya Haladi Ceremony

हळद लागली! विशाल-अक्षयाच्या हळदी समारंभाचा थाट, पारंपरिक पद्धतीने पार पडला कार्यक्रम; फोटो समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.