प्रत्येकाच्या आयुष्यात फिटनेसच विशेष महत्त्व असलेलं पाहायला मिळतं. विशेषतः कलाकार मंडळी त्यांच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसतात. योगा, जिम असे विविध प्रकार करुन ते त्यांच्या आरोग्याची काळजी घेताना दिसतात. या कलाकारांच्या यादीत एका अभिनेत्रीचे नाव आवर्जून घेतले जाते ते म्हणजेच अभिनेत्री ऐश्वर्या नारकर. ऐश्वर्या नारकर या स्वतःची विशेष काळजी घेताना दिसतात. वयाची पन्नाशी ओलांडली तरी अत्यंत फिट आणि तरुणाईला लाजवेल असा त्यांचा अंदाज आहे. त्या त्यांच्या आरोग्याची काळजी घेत योगासने करत विशेष लक्ष देत असतात. (Aishwarya Narkar Answers To Trollers)
सोशल मीडियावरुनही ते त्यांच्या योगा वा जिम करतानाचे अनेक व्हिडीओ शेअर करताना दिसतात. सोशल मीडियावर ऐश्वर्या या बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच काही ना काही शेअर करत त्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. बरेचदा त्या ट्रेंडिंग रीलवर व्हिडीओ शेअर करताना दिसतात. ही ट्रेंडिंग रील व्हिडीओ काहींच्या पसंतीस पडतात. काही चाहते या व्हिडीओचं भरभरुन कौतुक करतात. तर काही चाहते हे त्यांना ट्रोलही करतात. बरेचदा ऐश्वर्या नेटकऱ्यांच्या या ट्रोलिंगला सडेतोड उत्तर देताना दिसतात.
अशातच ऐश्वर्या यांचा व्यायाम करतानाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. “मॉर्निंग वाइब्स” असं कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. ऐश्वर्या नारकरांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. “ऐश्वर्या मॅडम एक नंबर”, “खूप छान प्रयत्न करत आहात”, “मॅम तुमच्या फिटनेसची मी खूप मोठी चाहती आहे” अशा अनेक कमेंट करत ऐश्वर्या यांचं त्यांच्या चाहत्यांनी भरभरुन कौतुक केलं आहे. पण एका नेटकऱ्याने केलेल्या खटकणाऱ्या कमेंटने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

“जवानीमध्ये असे नखरे दाखवायला पाहिजे होतेस”, अशी कमेंट करत नेटकऱ्याने त्यांना ट्रोल केलं आहे. या कमेंटवर ऐश्वर्या नारकरांनी संताप्तजनक उत्तर दिलं आहे. नेटकऱ्याच्या प्रतिक्रियेचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर करत त्या म्हणाल्या, “भाऊ कशाला स्वतःची लायकी दाखवता”. अभिनेत्रीच्या या स्टोरीने सध्या साऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे.