शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Satvya Mulichi Satavi Mulgi : पायाला लागल्याचे केदारचे खरं सत्य सर्वांसमोर येणार, नेत्रा करणार मोठा खुलासा, काय असेल नेमकं कारण?

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 13, 2024 | 1:27 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Satvya Mulichi Satavi Mulgi Serial Updates of Kedar lies will be exposed.

सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत केदारच्या पायाला लागल्याचा खोटेपणा समोर येणार

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मालिकेत नेहमीच नवनवीन ट्विस्ट येत असतात. रहस्यमय कथानकामुळे आणि मालिकेतील नवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांची आवडती मालिका होत आहे. काही दिवसांपूर्वी मालिकेत केदार या पात्राची एन्ट्री झाली. मालिकेत केदार या पात्राची एन्ट्री झाल्यापासून मालिकेला एक नवीन वळण आले आहे. केदार या पात्रामुळे कथानक वेगळ्या वळणावर येऊन पोहोचलं आहे. मालिकेत केदारची भूमिका अभिनेता अभिजीत केळकरने साकारली आहे. त्याची ही भूमिका सर्वांची लक्षवेधी आहे. (Satvya Mulichi Satavi Mulgi Serial Updates)

मालिकेत नेत्रा केदारच्या विरोधात उभी न राहता शेखरला पाठिंबा देते. केदार केतकीला मनवून कुटुंबात फूट पाडण्याचा आणि वारंवार मैथिलीला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पण नेत्रा आणि ईशा त्याचे हे प्रयत्न हाणून पाडतात. केदार अद्वैत आणि शेखरमध्येसुद्धा भांडण लावण्याचा प्रयत्न करतो. इकडे पण नेत्रा त्याचे डाव उधळून लावते. केदार ईशाचे अपहरण करण्याचा प्रयत्न करतो, पण चुकून रीमाला यात गोवतो. अशातच गेल्या भागात केदारने नेत्राच्या मुलींमध्येही भांडण लावण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – ऑफस्क्रिन सासूबाईंवरही जीवापाड प्रेम करते शिवानी रांगोळे, वाढदिवसाच्या दिल्या हटके शुभेच्छा, म्हणाली, “माझी इच्छा…”

केदार ईशासाठी एक ड्रेस घेऊन येतो. मात्र रीमासाठी तो काहीही आणत नाही आणि नेत्राने ईशा यातही ड्रेस आणायला सांगितल्याचे रीमाला सांगतो. यामुळे तिच्या मनात संशय निर्माण होतो. त्यानंतर केदार रीमा यांना घेऊन बाहेर जातो आणि रीमाला ती अद्वैत-नेत्राची मुलगी नसल्याचे सांगतो आणि रीमाही त्यावर विश्वास ठेवते. त्यानंतर ही गोष्ट रीमाने कुणाला सांगू नये असंही तिला म्हणतो. अशातच आता आणखी एक प्रोमो समोर आला आहे, ज्यातून केदारचा खोटेपणा समोर येणार आहे. केदार पायाला लागल्याचे नाटक करत सहानुभूती घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याची हीच गोष्ट नेत्रा व ईशा ओळखतात.

आणखी वाचा – मराठी दिग्दर्शक व निर्मात्याकडून सूरज चव्हाणला महागडं गिफ्ट, ‘त्या’ वस्तूचं नावही उच्चारता येईना, मजेशीर व्हिडीओ व्हायरल

यावेळी ईशा केदारच्या अंगावर खोटा साप टाकते. यामुळे केदार घाबरतो आणि डायनिंग टेबलवर चढतो. त्याचा हा खोटेपणा सर्वांसमोर उघड होतो. यावेळी त्याला असं हे बघून केतकीचाही त्याच्यावरचा विश्वास उडतो. यानंतर तेजस त्याला विचारतो की, “तू हे सगळं सहानुभूतीसाठी करत होतास का?”. यानंतर नेत्रा असं म्हणते की, “मी सांगते केदारने हे असं नाटक का केलं?” दरम्यान, यापुढे प्रोमो कट होतो. त्यामुळे आता नेत्रा केदारच्या या नाटक करण्यामागचे नेमके कारण काय सांगणार? केदार त्याची ही फसवणूक कशी सिद्ध करणार? हे मालिकेच्या आगामी भागातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.  

Tags: Marathi Serial NewsSatvya Mulichi Satavi Mulgi Marathi SerialSatvya Mulichi Satavi Mulgi Serial Updates
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
Mahavatar First Look Poster

'छावा'नंतर विकी कौशलचं आणखी एक मोठं पाऊल, 'महावतार'मध्ये भगवान परशुरामाची भूमिका साकारणार, लूक समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.