शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

विरोचकालाही पाचव्या पेटीचे संकेत, नेत्रा व रुपाली यांच्यापैकी नक्की कुणाच्या हाती लागणार पंचपिटीका?

Saurabh Moreby Saurabh More
मे 27, 2024 | 10:58 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Satvya Mulichi Satavi Mulgi serial update Virochak also got a hint of the fifth box along with netra

विरोचकालाही पाचव्या पेटीचे संकेत, नेत्रा व रुपाली यांच्यापैकी नक्की कुणाच्या हाती लागणार पंचपिटीका?

झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत एकामागून एक येणाऱ्या ट्विस्टमुळे ही मालिका दिवसेंदिवस अधिकच रंजक होत आहे. मालिकेत नुकतंच विरोचकाने राजाध्यक्ष कुटूंबातील केतकी काकु, फाल्गुनी, शेखर, तन्मय व तेजस या सर्वांना वश केले असल्याचे पाहायला मिळाले. मात्र आता तिच्या वशमधून हे सगळेच बाहेर आले आहेत आणि घरातील सर्व जण पाचव्या पेटीचा शोध घेत आहेत.

ग्रहण संपल्यामुळे रुपालीची वशीकरणाची शक्ती संपली. त्यानंतर तो बेशुद्ध पडला असल्याचे पाहायला मिळाले. अशातच आता विरोचक पुन्हा एकदा शुद्धीवर आला आहे. अशातच विरोचकाला राजाध्यक्ष शोधत असलेल्या पाचव्या पेटीबद्दलही माहिती होत आहे. राजाध्यक्ष यांच्या घरी भविष्य सांगणारे येतात आणि ते देवीआईच्या कळसाबद्दल बोलत असतात. यावरून पाचवी पेटी देवीआईच्या त्या कळसात असण्याविषयीची माहिती मिळते.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – अर्जुन-चैतन्य साक्षीचं पितळ उघडं पाडणार?, सायलीचीही मधुभाऊंच्या केससाठी मोठी मदत, मोठा पुरावा थेट घरीच आणला

पाचव्या पेटीबद्दल कळताच विरोचक त्या पेटीच्या शोधात निघतो आणि विरोचक पेटीच्या शोधात निघाल्याचे नेत्राला कळते. विरोचकही पाचवी पेटी शोधत असून त्याला पेटीबद्दलची माहिती लागली असल्याचे कळते. त्यामुळे आता विरोचक व नेत्रा दोघेही पाचव्या पेटीचा शोध घेत आहेत. देवीआईच्या लेकी व राजाध्यक्ष कुटुंबातील सगळेजण चौथ्या पेटीच्या श्लोकाचा अर्थ समजून घेऊन पाचव्या पेटीचा शोध घेणार आहेत.

आणखी वाचा – ‘सिंह’ व ‘तूळ’ राशीच्या लोकांना आज आर्थिक लाभ होणार, इतर राशींच्या नशिबात नेमकं काय? जाणून घ्या…

गेल्या भागात शेखरने रुपालीला तिचा अंत नेत्राच्या हातून होणार असल्याचेही सांगितले आहे. त्यामुळे विरोचकाचा अंत नक्की नेत्राच्या हातून होणार की देवीआई विरोचकाचा अंत करणार हे पुढील भागात पाहायला मिळेल. त्यामुळे आता रुपालीच्या वशीकरणाच्या शक्तीतून बाहेर आल्यानंतर राजाध्यक्ष कुटुंबियांना पाचव्या पेटीचा शोध लागणार का? यात नेमकं काय दडलेलं असणार? हे आता आगामी भागांत पाहायला मिळणार आहे. तसेच पाचव्या पेटीचा शोध आधी विरोचक घेणार? की नेत्राच्या हाती ही पाचवी पेटी लागणार? हे पाहण्यासाठी सगळेच जण मालिकेतील पुढील भागांची आतुरतेने वाट पाहत आहेत.   

Tags: marathi entertainment newsMarathi Serial NewsSatvya mulichi satavi mulgi
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Milind Gawali Anniversary Post

"डोंबाऱ्याचा खेळ करत करत…", मिलिंद गवळींची लग्नाच्या वाढदिवसानिमित्त बायकोसाठी खास पोस्ट, म्हणाले, “३४ वर्षाचा प्रवास…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.