बुधवार, जुलै 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अयोध्येत भाजपाचा पराभव, मात्र निकालानंतर सोनू निगमवर लोकांनी काढला राग, सोशल मीडियावरही गदारोळ, नेमका प्रकार काय?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 5, 2024 | 12:11 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Sonu Nigam Singh Tweet Viral

अयोध्येत भाजपाचा पराभव, मात्र निकालानंतर सोनू निगमवर लोकांनी काढला राग, सोशल मीडियावरही गदारोळ, नेमका प्रकार काय?

२०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात जनतेने दिलेला निर्णय धक्कादायक होता. विशेषत: अयोध्येत, जिथे भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला याने साऱ्या भारतीयांना धक्का बसला. फैजाबादच्या लल्लू सिंग यांचा करार संपला आहे. येथे समाजवादी पक्षाचे (एसपी) उमेदवार अवधेश प्रसाद ५६ हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत. या सगळ्यात गायक सोनू निगमवर जनता नाराज आहे. त्यांच्या एका ट्विटने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली. (Sonu Nigam Singh Tweet Viral)

अयोध्येतील लोकसभेच्या जागेवर भाजपच्या पराभवानंतर, सोनू निगम नावाच्या ट्विटर म्हणजेच आताच्या एक्स अकाउंटवरुन एक ट्विट करण्यात आले आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “ज्या सरकारने संपूर्ण अयोध्या उजळून टाकली, नवे विमानतळ दिले, रेल्वे स्टेशन दिले, ५०० वर्षांनंतर राम मंदिर बांधले, संपूर्ण मंदिर अर्थव्यवस्था केली, त्या पक्षाला अयोध्येच्या जागेसाठी संघर्ष करावा लागला. अयोध्यावासीयांसाठी ही लाजिरवाणी बाब आहे”.

आणखी वाचा – “मला मुस्लिमांची, ख्रिश्चनांची भिती नाही पण…”, निवडणुकीच्या निकालानंतर शरद पोंक्षेंची पोस्ट चर्चेत, म्हणाले, “हिंदूच…”

हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांनी गायक सोनू निगमवर टीका करण्यास सुरुवात केली. एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले आहे की, “तुला गाण्याची संधीही मिळाली का?, ज्यांची घरे उद्ध्वस्त झाली त्यांचा विचार कर. खोटी गाणी गाणाऱ्यांनी तुम्हाला तर लाज वाटली पाहिजे. काहीही माहीत नसताना गाणं गाऊ नये”. तर दुसऱ्याने कमेंट केली आहे की, “तुझ्यासारखीच बाकीची लोकं गाणे गाऊन लाखो रुपये जमवणार नाहीत. लोकांना समजले आहे की, नुसती मंदिराची घंटा वाजवून घर चालणार नाही. तुमच्यापैकी बाकी द्वेषी कॉर्पोरेशन तुम्हीच शहाणे आहात”.

आणखी वाचा – सायली-अर्जुन पाहतायत बाळाची स्वप्नं, होणार का आई-बाबा?, बाळासाठी तरी एकत्र येणार का?, मालिकेत मोठा ट्विस्ट

हे ट्विट गायक सोनू निगमचे असल्याचे समजून शिव्याशाप देणारे लोक गैरसमजाचे बळी ठरले आहेत. खरंतर हे ट्विटर अकाऊंट बॉलिवूड सिंगर सोनू निगमचे नसून सोनू निगम सिंगचे आहे. सोनू निगम सिंग हा वकील असून तो मूळचा बिहारचा आहे. या ट्विटर अकाऊंटचा गायक सोनू निगमशी काहीही संबंध नाही, मात्र ते व्हेरिफाय करुन अकाऊंटवर ‘सोनू निगम’ असे नाव लिहिण्यात आल्याने लोकांचा भ्रमनिरास होत आहे.

Tags: Bjp Lost Ayodhya Lok Sabha Seatbjp politicianentertainmentsonu nigamSonu Nigam Singh Tweet Viral
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
kaylee hottle died
Entertainment

‘गॉडजिला वर्सेस कॉन्ग’ फेम अभिनेत्रीचा कार अपघातात मृत्यू, वडिलांप्रमाणे लेकीलाही ऐकू येत नव्हतं आणि…

जुलै 22, 2026 | 11:00 am
Naseeruddin Shah On CJP Protest
Entertainment

चेहऱ्यावर मास्क आणि हातात काठ्या; विद्यार्थ्यांवरील हिंसाचाराच्या विरोधात बॉलिवूड अभिनेता भडकला, म्हणाला, “गुंडांच्या हातून…”

जुलै 22, 2026 | 10:13 am
Savalyachi Janu Savali Team
Entertainment

‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेची टीम वारीत दंग, पारंपरिक वेशभूषेत पोहोचले विठूरायाच्या दर्शनाला

जुलै 21, 2026 | 12:39 pm
Next Post
Swapnil Joshi, Ankush Chaudhari, Saie Tamhankar and Sanjay Jadhav is once again coming up with a new film see the details

'दुनियादारी'चं त्रिकुट ११ वर्षांनी पुन्हा एकत्र, स्वप्निल-सई-अंकुश यांचा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, नाव काय असणार?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.