सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत आता रुपालीला नेत्राच्या गरोदरपणाबद्दल माहित झाली आहे. रुपालीने तिला प्राप्त झालेल्या प्रतिबिंब शक्तीचा वापर करून अद्वैतचे प्रतिबिंब करते आणि त्याला नेत्राच्या गरोदरपणाबद्दलची माहिती काढायला सांगते. यावर अद्वैतचे प्रतिबिंब नेत्राच्या खोलीत जाऊन तिच्या प्रेग्नन्सीच्या सगळ्या फाईल्स तापसतो आणि ती गरोदर असल्याची खात्री करतो. त्यानंतर नेत्रा गरोदर असल्याची बातमी लगेच तो रुपालीला देतो.
यावेळी रुपालीला प्रतिबिंब हे तेरा मिनिटे राहून नंतर गायब होत असल्याचेही तिला कळते. त्याप्रमाणे ती अद्वैतकडून नेत्राच्या गरोदरपणाची माहिती काढते. पुढे नेत्राच्या होणाऱ्या बाळापासून आपल्याला धोका असल्याचे समजून रुपाली नेत्राच्या बाळाला मारण्याचा प्रयत्न करतानाचे आजच्या भागात पाहायला मिळेल. नेत्राचे होणारे बाळ हा आपला नवीन शत्रू असल्यामुळे हा नवीन शत्रू निर्माणच होता कामा नये यासाठी रुपाली नेत्राच्या बाळाला जीवे मारणार आहे.
यासाठी रुपाली नेत्राला एक ज्यूस बनवून देते. त्यात ती बाळाला मारण्याचे औषध टाकते. तेच ज्यूस पुन्हा नेत्रा पिते. ज्यूस पिताच तिच्या पोटात कळा सुरु होऊ लागतात. नेत्राचे पोट अचानक दुखू लागते. पोट दुखू लागल्याने अद्वैत वेडापिसा होतो आणि काळजीपोटी तो नेत्राला घेऊन लगेच डॉक्टरांकडे जायला निघतो.
आणखी वाचा – ‘या’ मराठी अभिनेत्री लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा कशी करणार साजरी?, नवा सण असणार खास
जिन्यावरून उतरत असताना त्यांना केतकी काकू, तन्मय व फाल्गुनी भेटतात आणि ते नेत्राविषयी विचारपूस करू लागतात. मात्र तितक्यात मागे विरोचकाला बघून नेत्रा तिचे पोटात दुखत असल्याचे थांबवुन सर्वांना आईस्क्रीम हवी असल्याचे विचारते. जेणेकरून विरोचकाला तिच्याबद्दल संशय येऊ नये.
आणखी वाचा – ‘तारक मेहता…’मधून गोलीचाही काढता पाय, १६ वर्ष काम केल्यानंतर मालिका सोडण्याचा निर्णय कारण…
अशातच आता नेत्राच्या पोटात नेमके कशामुळे दुखत आहे?, तिच्या बाळाला काही होणार तर नाही ना? विरोचक नेत्राच्या बाळाला जीवे मारण्यात यशस्वी होईल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या भागात मिळणार आहेत. त्यामुळे आगामी भागासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत.